प्रकाश आंबेडकर हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना महायुतीसह उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
'उद्या एकनाथ शिंदेंकडे जी शिवसेना आहे तिचे प्रमुख राज ठाकरे झाले तर आश्चर्य व्यक्त करू नये. नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी दोन भावंडांमध्ये रेस लावलेली आहे. लॉयल्टीची रेस लावलेली आहे. मोदी म्हणाले होते की, गरज पडली तर उद्धवजींना सर्वतोपरी मदत करेल आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना मजबूर करणे, प्रचाराला बोलावणे असे प्रकार सुरू आहे. दोन भावंडांमध्ये अधिक लॉयल्टी कोणाकडे यामध्ये चुरस लावलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील अशी परिस्थिती दिसत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
advertisement
'भाजपला RSS नकोय'
'एक चांगली गोष्ट आहे ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत. मी मोहन भागवतांना विचारले होते की, मागच्या दोन वर्षात मोदींनी भेटायला वेळ दिली का याचे उत्तर अजून आलं नाही. जेपी नड्डा यांच्या वक्तव्यावरून सगळ सर्व दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नको झाली आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.
'उद्धव ठाकरेंचा दिखावा'
'मला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची नाही. त्यांना मुस्लिमांनी प्रश्न विचारला होता लोकसभा संपल्यानंतर भाजप सोबत समझोता करणार की नाही करणार? त्याचं उत्तर न देता ते मोदींवर टीका करत आहेत. हा दिखावा आहे असे मी म्हणतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली.
