राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार विमान अपघातावर भाष्य केले.
अपघात धुक्यानं की धोक्यानं?
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाही. रोहित पवार यांनी या प्रकरणातील मुद्दे, तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मात्र, त्यांचा एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का निर्माण केले जात आहेत, असा खडा सवाल राज यांनी केला.
advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले की, रोहित पवारांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. डीसीपींनी एफआयआर नोंदवून घेण्यास थांबवलं. दोन-तीन वेळेस त्यांचा एफआयआर नोंदवून घेतला नाही. कोणाचा दबाव आहे, असा सवाल करतानाच राज ठाकरे यांनी सरकारकडून संशयाचं भूत नाचवल जात असल्याचे म्हटले.
रोहित पवार यांचा एफआयआर का नोंदवून घेत नाही, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार यांच्या कुटुंबातूनच अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी होत असेल तर यात गैर काय असा सवालही त्यांनी केला.
रोहित पवार आमदार असून एफआयआर घेत नसतील सामान्य माणसाचं काय, अशी उद्ग्विनता त्यांनी व्यक्त केली. हा अपघात दु्र्देवी आहे. सुनेत्रा पवार सरकारमध्ये आहेत, त्यांनीदेखील याबाबत बोलायला हवं, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
