TRENDING:

Raj Thackeray: ''मलाही ऑफर आलेली, पण..." : राज ठाकरेंनी उमेदवारांसमोर केला खळबळजनक गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Raj Thackeray MNS Candidates: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. या युतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना खास “कानमंत्र” दिला आहे. आज राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' येथे मनसेच्या सगळ्या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एकजूट ठेवण्याची सूचना करताना निवडणुकीआधी 'कानमंत्र' देखील दिला.
मलाही ऑफर आलेली, पण..." : राज ठाकरेंनी उमेदवारांसमोर केला खळबळजनक गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?
मलाही ऑफर आलेली, पण..." : राज ठाकरेंनी उमेदवारांसमोर केला खळबळजनक गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?
advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. या युतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली जात आहे. मनसे मुंबईत ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. राज ठाकरे यांनी आज सगळ्या मनसे उमेदवारांची शिवतीर्थ येथे बैठक घेतली.

मलाही ऑफर आलेली...

राज ठाकरे यांनी पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, असा स्पष्ट इशारा देताना आपणालाही अनेकदा प्रलोभनं देण्यात आली होती, मात्र ती ठामपणे नाकारल्याचं सांगितलं. “तुम्हाला पैशांचे आमिष दाखवले जातील. मला सुद्धा ऑफर देण्यात आल्या होत्या, पण मी त्या बाजूला सारल्या. तुम्हीही त्याला बळी पडू नका. पैसे दिले तरीही मत विकू नका. मुंबई वाचवायची आहे,” असे ठाम शब्दांत राज ठाकरे यांनी उमेदवारांना सांगितले.

advertisement

बुथवर १० माणसं ठेवा अन्...

राज ठाकरे यांनी म्हटले की, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि आपल्याकडे ही शेवटची संधी असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक व्यवस्थापनावर विशेष भर दिला. “प्रत्येक बूथवर आपली किमान दहा माणसं उभी करा. बोगस मतदान होता कामा नये. तुम्ही सतर्क राहा,” असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.

बोगस मतदानाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. “जर बोगस मतदार सापडला, तर त्याला तिथेच फटकावून काढा,” असे कडक शब्द त्यांनी वापरले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
30 गुंठ्यात केली शेती, 4 महिन्यात मिळालं दिड लाख उत्पन्न, असं काय केलं?
सर्व पहा

राज ठाकरे यांच्या या सल्ल्यामुळे मनसेकडून निवडणुकीत आक्रमक आणि शिस्तबद्ध रणनीती आखली जात असल्याचं स्पष्ट होत असून, मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: ''मलाही ऑफर आलेली, पण..." : राज ठाकरेंनी उमेदवारांसमोर केला खळबळजनक गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल