TRENDING:

Raj Thackeray On Mumbai Pune Expresssway: ''...याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा...'', मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ३२ तासांच्या कोंडीवरून संतापले राज!

Last Updated:

Raj Thackeray On Mumbai Express way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३० तास ठप्प झाला होता. आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅसचा टँकर उलटल्याने ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३० तास ठप्प झाला होता. आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅसचा टँकर उलटल्याने ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे आबालवृद्धांचे हाल झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे सारखा महत्त्वाचा महामार्ग ठप्प झाल्याने सरकारवर जोरदार टीका सुरू झाली. सामान्यांकडून संताप व्यक्त होत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर प्रशासकीय अनास्थेवर नाराजी व्यक्त केली आहे.
''...याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा...'', मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ३२ तासांच्या कोंडीवरून संतापले राज!
''...याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा...'', मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ३२ तासांच्या कोंडीवरून संतापले राज!
advertisement

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटल्याने या महामार्गावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. ज्वलनशील गॅसची गळती होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. अग्निशमन दल, एचपीसीएलचे तांत्रिक पथक आणि महामार्ग पोलिसांनी जीवाची बाजी लावून ही गळती रोखली. अखेर २७ तासांनंतर क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्यात आला आणि रस्ता सुरक्षित करण्यात आला. वाहतूक सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला. आता, महामार्गावर असलेल्या उणीवांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

राज ठाकरे यांनी म्हटले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी सरकार, प्रशासकीय अनास्थेवर ताशेरे ओढले आहेत.

राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का? हा प्रश्न आहे.

advertisement

मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.

advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.

हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray On Mumbai Pune Expresssway: ''...याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा...'', मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ३२ तासांच्या कोंडीवरून संतापले राज!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल