TRENDING:

आरक्षणाशिवाय महाराष्ट्रातील मुला-मुलींना रोजगार देणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

Last Updated:

माझ्या महाराष्ट्रातील मुला मुलींना १०० टक्के रोजगार हा महाराष्ट्रातच मिळवून देऊ अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप त्यांचा संपूर्ण जाहिरनामा जाहीर केला नाही आहे. मात्र लातूरच्या सभेत राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहिरनाम्यातल्या प्रमुख मुद्याची घोषणा केली आहे. माझ्या महाराष्ट्रातील मुला मुलींना १०० टक्के रोजगार हा महाराष्ट्रातच मिळवून देऊ अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.
शरद पवारांनी जातीचं राजकारण सूरू केलं
शरद पवारांनी जातीचं राजकारण सूरू केलं
advertisement

राज ठाकरे लातूरच्या रेणापूरमध्ये मनसेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहिरनाम्या मधला प्रमुख मुद्दा सांगितला. या माझ्या महाराष्ट्रातील मुला मुलींना १०० टक्के रोजगार हा महाराष्ट्रातच मिळेल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.तसेच खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण नाही आणि ते आरक्षण देत पण नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो, खाजगी कंपन्यांमध्ये देखील महाराष्ट्रातील मुला-मुलींना तिथे नोकऱ्या मिळतील. पण उद्या त्यांना महाराष्ट्रात  उद्योगधंदे करायचे असतील तर माझ्या महाराष्ट्रातील मुला मुलीच तुम्हाला घ्यावेच लागणार आहे. आणि त्यांच्या हाताला काम मिळाली तर जागा उरल्या तर बाहेरच्या राज्यातील मुलांचा विचार करू असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच मी माझ्या जाहिरनाम्यात तेवढ्याच गोष्टी टाकणार आहे, ज्या मला शक्य आहे, असे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

advertisement

मराठा आऱक्षणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सर्व पक्ष तुम्हाला झुलवत ठेवतायत, भुलथापा देतायत. अशाप्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी ही सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतोय. हीच परीस्थिती मी जरांगेंसमोर मांडल्याचे देखील राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

इतकी वर्ष तीच तीच माणसं निवडून दिल्यावरती नवीन लोकांना संधी द्या

advertisement

दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष असन हे संघर्षाचं कारण

शरद पवारांनी जातीचं राजकारण सूरू केलं

जातीच राजकारण करून तुमची माथी भडकवली

राज ठाकरेंच्या हाताता एकदा सत्ता देऊन बघा

मी माझ्या जाहिरनाम्यात तेवढ्याच गोष्टी टाकणार आहे, ज्या मला शक्य आहे

या माझ्या महाराष्ट्रातील मुला मुलींना१०० टक्के रोजगार हा महाराष्ट्रातच मिळेल

खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण नाही आणि ते आरक्षण देत पण नाही

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

मी तुम्हाला शब्द देतो, खाजगी कंपन्यांमध्ये देखील महाराष्ट्रातील मुला मुलींना तिथे नोकऱ्या मिळतील. उद्या उद्योगधंदे महाराष्ट्रात करायचे असतील तर माझ्या महाराष्ट्रातील मुला मुलीच तुम्हाला घ्यावे लागतील,त्यांच्या हाताला काम मिळाली तर जागा उरल्या तर बाहेरच्या राज्यातील मुलांना बोलावू

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आरक्षणाशिवाय महाराष्ट्रातील मुला-मुलींना रोजगार देणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल