अभिनेते प्रवीण परदेशी हे मनसेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत. मनसेच्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण परदेशी यांनी 'मी संघाचा कार्यकर्ता आहे' असे छाती ठोकपणे सांगितलं होतं. इतकेच नव्हे तर, त्यांचे आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो देखील राज ठाकरेंपर्यंत पोहोचले होते.
या प्रकारानंतर राज ठाकरे यांनी प्रवीण परदेशी यांना स्पष्ट शब्दात खडसावले. "तू एकाच ठिकाणी कुठे तरी राहा! कशाला टाईमपास करतोस?" असा रोखठोक सल्ला राज ठाकरे यांनी परदेशी यांना दिला. मनसेचे पदाधिकारी असूनही दुसऱ्या संघटनेशी असलेली निष्ठा जाहीरपणे बोलून दाखवणे आणि संबंधित फोटो व्हायरल करणे, ही बाब राज ठाकरेंना खटकली. यामुळे त्यांनी प्रवीण परदेशींना सुनावल्याची माहिती आहे.
advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे विविध ठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. नुकतीच त्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरेंनी पिट्ट्याभाईला झापलं आहे.
