राजकीय वैमनस्यातून हत्या
खोपोलीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेल्याने ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे. शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी मंगेश काळोखे यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा ३८ सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं दिसत आहे.
advertisement
सीसीटीव्ही व्हिडीओनुसार, टोळक्याने २४ ते २७ वार करत ही हत्या केली. यावेळी रवींद्र देवकरचा बॉडीगार्ड आणि वाल्मीक कराडचा साथीदार असलेल्या आरोपीनं २७ पैकी १३ वार त्याने एकट्यानेच केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या प्रत्यक्ष हल्ल्यात रवींद्र देवकरचा मुलगा देखील असल्याचं दिसून येत आहे. सर्व आरोपी अटकेत असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
एकाच कुटुंबातील ४ आरोपींसह ९ जणांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये रवींद्र देवकर, उर्मिला देवकर (पत्नी), धनेश देवकर (मुलगा), दर्शन देवकर (मुलगा), विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार अशा नऊ जणांचा समावेश आहे.
