महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याजवळील बारामती विमानतळावर विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या भीषण घटनेनंतर बारामती विमानतळाची सुरक्षा, तिथल्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि तांत्रिक त्रुटींवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकारण्यांची सातत्याने वर्दळ असलेल्या या विमानतळाकडे सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज बारामती विमानतळ येथे DGCA काय काय तपासणी आणि पाहणी केली याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
advertisement
DGCA ने कधी तपासणी केल्या?
१० फेब्रुवारी २०२६ – दुपारी ४ वाजल्यापासून
११ फेब्रुवारी २०२६ – दुपारी १.३० पर्यंत
DGCA कोणते अधिकारी उपस्थित होते?
1. प्रमोद कुमार – संचालक, एअरोड्रोम मानके (Aerodrome Standards), DGCA
2. सौरभ कुमार – सहाय्यक संचालक, फ्लाइंग ट्रेनिंग, DGCA
3. ऋषी शंकर झा – सहाय्यक संचालक, फ्लाइट स्टँडर्ड्स, DGCA
DGCA पथकाने खालील बाबींची प्रत्यक्ष स्थळ केली तपासणी
1. रनवे ११
2. विमान अपघात स्थळ
3. तात्पुरती (Makeshift) एटीसी सुविधा
4. बारामती विमानतळावर कार्यरत फ्लाइंग ट्रेनिंग संस्था:
• कार्व्हर एव्हिएशन (Carver Aviation)
• रेडबर्ड एव्हिएशन (Redbird Aviation)
कोणकोणत्या गोष्टींचा घेतला सविस्तर आढावा
- कार्यपद्धती (Operational Practices)
- विमानतळ पायाभूत सुविधा
- सुरक्षा व आपत्कालीन प्रतिसाद सज्जता
- नियमांचे पालन (Regulatory Compliance)
- फ्लाइंग ट्रेनिंग संचालन
- एअरफिल्ड वापर पद्धती
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवारांच्या अपघातानंतर 13 दिवस उलटले तरी सरकारनं सखोल चौकशी का सुरू केली नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न सीआयडीला विमान अपघाताचा तपास करण्याचा अधिकार आहे का? हे सगळं एकत्र जोडत रोहीत पवार यांनी एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला की अजित दादांचा केवळ अपघात नव्हता, तर तो एक नियोजित कट होता. आत सख्खा पुतण्या रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा :
रोहित पवारांच्या स्फोटक परिषदेनंतर 2 तासातच DGCA चा मोठा निर्णय, VSR विमान कंपनीचा काऊंटडाऊन सुरू
