TRENDING:

Rohit Pawar: बारामतीची पोटनिवडणूक जाहीर, रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर

Last Updated:

बारामती विधानसभा मतदारसंघातून निर्विवादपणे अजितदादा निवडून येत होते. आता दादांच्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने रोहित पवार भावूक झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असं सूत्र मानलं जायचं पण अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला...दादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार पोट निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम देखील जाहीर केला. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आमदार रोहित पवार भावूक झाले.
News18
News18
advertisement

रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील नाते तसे एकदम खास. रोहित पवार हे भविष्यातील भारदस्त नेते होण्याची ताकद ठेवतात हे अजित पवार यांनी ओळखले होते. त्यामुळेच जिथे चुकेल तिथे काका म्हणून अधिकारवाणीने ते रोहित पवार यांना रागवत असत. रोहित पवार यांनीही काकांचे बोलणे मनाला लावून घेतले नाही. काही वर्षे राजकारणातील वाटा जरी वेगळ्या झाल्या तरी काका पुतण्याचे नाते त्यांनी प्रेमाने जपले. काका म्हणून रागावण्याचे ओरडण्याचे सगळे अधिकार रोहित पवार यांनी अजितदादांकडे जैसे थे ठेवले. एरवी राजकीय चूल वेगळी मांडल्यावर नात्यात दुरावा येतो. परंतु पवार घराण्यातील शिकवणीमुळे त्यांच्या नात्यात कधी अंतर पडले नाही. अजितदादांच्या आठवणीत  रोहित पवार अनेकदा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

advertisement

गेली अनेक दशकं बारामती विधानसभा मतदारसंघातून निर्विवादपणे अजितदादा निवडून येत होते. आता दादांच्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने रोहित पवार भावूक झाले. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले रोहित पवार? 

रोहित पवार म्हणाले, ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..

advertisement

बारामतीत सलग आठ वेळा निवडून आले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video
सर्व पहा

अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक एकूण 8 वेळा लढवली. आणि सर्व वेळा त्यांनी विजय मिळवला. ते प्रामुख्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. 1991 ते 2024 या कालावाधीत सलग आठ वेळा ते निवडून आले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरिता सुनेत्रा पवार यांचा सध्यातरी एकमेव अर्ज असणार असल्याचे सोबत असणाऱ्या पक्षांनी जाहीर केले आहे परंतु बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरिता सुनेत्रा पवार यांच्या विरोधात इतर पक्षामार्फत उमेदवार उभा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar: बारामतीची पोटनिवडणूक जाहीर, रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल