TRENDING:

अजित दादांच्या अपघातानंतर पुन्हा स्फोट का झाला? विमानात काय काय होतं? रोहित पवारांची धक्कादायक माहिती

Last Updated:

Rohit Pawar On Ajit Pawar Accident : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये रोहित पवारांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये रोहित पवारांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
ajit pawar plane crash
ajit pawar plane crash
advertisement

रोहित पवार काय म्हणाले?

आमदार रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या अपघाताचा जी यंत्रणा तपास करतेय त्यावर माझा आक्षेप आहे.अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे. अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो. ब्लॅक बॉक्सबाबत आम्ही शंका व्यक्त केली होती. अपघातानंतर पुन्हा स्फोट झाले, त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

advertisement

स्फोट का झाला?

रोहित पवार पुढे म्हणाले की, अपघातानंतर स्फोट का झाला? तर याचं उत्तर अतिरिक्त इंधन आहे. बारामतीला जाण्यासाठी एवढं इंधन घेऊन जाण्याची गरज काय होती? विमानमध्ये इंधनाच्या अतिरिक्त टाक्या का ठेवण्यात आल्या होत्या? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

ब्लॅक बॉक्स कधी निकामी होतो?

डिजिसीएच्या निकषापेक्षा कमी दृश्यमानता होती. विमान मुद्दाम आदळण्यात आलं? अशी शंका यांच्या मनात होती. तसेच ११०० अंशाला जळाला तर ब्लॅक बॉक्स निकामी होतो.असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

advertisement

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांचा समावेश होता. यावेळी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन सादर करत संबंधित अपघातामागे ‘घातपात’ किंवा ‘गंभीर अनियमितता’ असण्याची शक्यता व्यक्त केली आणि सखोल चौकशीची मागणी केली.

advertisement

फडणवीसांचे आश्वासन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंदातून उद्योगाची भरारी, उभारला बैलगाड्यांचा व्यवसाय, वर्षाला 25 लाख उलाढाल
सर्व पहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला आश्वासन देताना सांगितले की, या प्रकरणात कोणताही संभ्रम राहू नये यासाठी राज्य शासन लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अधिकृत पत्र पाठवून सीबीआय चौकशीची शिफारस करेल. असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित दादांच्या अपघातानंतर पुन्हा स्फोट का झाला? विमानात काय काय होतं? रोहित पवारांची धक्कादायक माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल