TRENDING:

दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख, त्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार संतापले

Last Updated:

अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागाने ७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी अपघाती निधन झाले, त्याच दिवशी अल्पसंख्याक खात्याशी संबंधित अनेक फाईली मंत्रालयात मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागाने ७५ शाळा तथा संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. अल्पसंख्याक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून सूत्रे हलविल्याचा आरोप होत आहे.
रोहित पवार-अजित पवार
रोहित पवार-अजित पवार
advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा प्रकार गंभीर्याने घेतलेला असून तातडीने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर लगोलग कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत. असे असताना अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधाने सनसनाटी दावा केला आहे.

त्या फाईलचा रेट ३० ते ४० लाख

राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याच्या प्रकरणाचा संशय खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जात असताना रोहित पवार यांनी संबंधित फाईलचा रेट ३० ते ४० लाख रूपये होता, असा दावा केला. अजित पवार यांचे पार्थिव बारामतीत ठेवले असताना अधिकाऱ्यांनी पैशांसाठी संबंधित फाईलवर तत्काळ स्वाक्षरी केल्याची नाराजी रोहित पवार यांनी बोलून दाखवली.

advertisement

त्या अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त केले पाहिजे-रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, अल्पसंख्याक विभागात आलेल्या संबंधित फाईलचा रेट ३०-४० लाख रूपये होता. त्या सर्व फाईल्सला अजित पवार यांचा विरोध होता, असे कळले. विरोध असतानाही आणि दादांचा अंत्यविधी सुरू असताना केवळ पैशांसाठी संबंधित अधिकारी स्वाक्षरी करण्यात दंग होते. मुख्यमंत्र्‍यांनी केवळ चौकशीचे आदेश देऊन थांबता कामा नये, तर त्यांनी संबंधित प्रकरण १० दिवसात निकाली काढले पाहिजे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त केले पाहिजे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.

advertisement

विलिनीकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रेंडिंग चॉकलेट बाउल, 70 रुपयांपासून चाखा चवं,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

विलिनीकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपलाय. दादांबरोबर आमची चर्चा झाली होती. आम्ही एनडीएत जायचे की दादा आमच्याबरोबर येऊन रस्त्यावरच लढाई लढणार या सगळ्यावर आम्ही बोललो होतो. परंतु आता आमच्याकडून पूर्णविराम लागला आहे. अजितदादा आम्हा सगळ्यांना जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. मंत्री मंगलप्रभात लोढांचे घर समोरच आहे. तिथले सीसीटीव्ही काढून आम्ही किती वेळा भेटलो, हे पाहा"

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख, त्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार संतापले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल