साक्षीस केक शॉपमध्ये मिळणाऱ्या वॉफलच्या विविध फ्लेवर्सना सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. डार्क डेविल, मिल्क मॅजिक, व्हाइट वंडर, ट्रिपल चॉकलेट आणि किटकॅट वॉफल असे स्वादिष्ट पर्याय ग्राहकांना फक्त 70 ते 80 रुपयांत मिळत असल्याने तरुणाई येथे आकर्षित होते आहे. कुरकुरीत, गरमागरम आणि चॉकलेटी फ्लेवर्सने भरलेले हे वॉफल दादरकरांची आवडती ट्रीट बनत आहेत.
advertisement
माय-लेकींनी सुरू केलं ‘करी पत्ता किचन’, पुणेकरांना स्वस्तात मिळतंय पोटभर जेवन, पाहा लोकेशन, Video
याशिवाय दुकानातील चॉकलेट बाउल्सही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. क्रंची, चॉकलेटी आणि आकर्षक प्रेझेंटेशनमुळे हे बाउल इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. दुकानात चॉकलेट बाउल 120, ट्रिपल चॉकलेट बाउल 140, ओरिओ बाउल 150, किटकॅट बाउल 150 तर ‘स्पेशल बाउल’ 170 रुपयांत उपलब्ध आहेत. या सर्व किमती स्मॉल बाउलच्या असून चवीमुळे हे बाउल ग्राहकांना पुन्हा-पुन्हा येथे खेचून आणत आहेत.
साक्षीस केक शॉपमध्ये केक ग्लासही उपलब्ध असून त्याची किंमत केवळ 100 रुपये आहे. तसेच सध्या स्ट्रॉबेरी सीझन असल्याने स्ट्रॉबेरीच्या विविध वेरायटीजही येथे विक्रीस आहेत. ताज्या स्ट्रॉबेरी आणि क्रीमसोबत तयार केलेले हे डेझर्ट्स ग्राहकांना विशेष आवडत आहेत.
गोड पदार्थांची आवड जोपासणाऱ्यांसाठी साक्षीस केक शॉप हे एक परफेक्ट डेस्टिनेशन बनले आहे. किफायतशीर किमतीत मिळणारे क्रंची वॉफल्स, स्वादिष्ट चॉकलेट बाउल्स आणि सिझनल डेझर्ट्समुळे या दुकानाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.





