रिक्षा चालकाला शिवीगाळ अन् हल्ला
रिक्षा चालक संजय गायकवाड यांनी कार थांबवायला सांगितल्यावर, कारमधील कुख्यात गुंड सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद एजाजने रिक्षा चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, त्याने धारदार कोयत्याने त्यांच्यावर जीवघेणा वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, संजय गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत वार चुकवला आणि तिथून त्वरित पळ काढला, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
advertisement
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हा संपूर्ण थरारक प्रकार जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत मिळाली. सिडको पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तत्परता दाखवली. पोलिसांनी आता आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, अवघ्या 12 तासांच्या आत, पोलिसांनी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या गुंडाला अटक केली आणि त्याची धिंड काढली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती, आणि नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
