TRENDING:

Sadabhau Khot : 'त्यांना देवेंद्र फडणवीस नावाची उचकी..' सदाभाऊ खोतांचा विरोधकांना टोला, म्हणाले..

Last Updated:

Sadabhau Khot : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली, (आसिफ मुरसल, प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "त्यांना देवेंद्र फडणवीस नावाची उचकी लागली आहे आणि दररोज त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या उचक्या थांबत नाहीत", अशा शब्दात आमदार खोतांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लागावला आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
News18
News18
advertisement

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सध्या सगळे विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जप करत आहेत. आणि ज्याचा जास्त जप होतो, तो प्रसन्न होतो, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांसाठी आशीर्वाद देण्यासाठी विजयाच्या रूपाने येतील असे, देखील आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा - विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा

advertisement

उद्धव ठाकरेंना सदाभाऊ खोत यांचा टोला

दरम्यान मनसे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वागत केले आहे. कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतला आहे. हा निर्णय रास्त असल्याचे देखील सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी एक तर आपण राहू नाहीतर तर देवेंद्र फडणवीस राहतील, या ठाकरेंच्या विधानाचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राहावं, पण उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राहावे, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sadabhau Khot : 'त्यांना देवेंद्र फडणवीस नावाची उचकी..' सदाभाऊ खोतांचा विरोधकांना टोला, म्हणाले..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल