Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा

Last Updated:

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी मुंबईतील शिवडी आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी मुंबईतील शिवडी आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पण राज ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करणं टाळलं. मनसेनं वरळीतील उमेदवाराची घोषणा का केली नाही? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी नुकतंच जाहीर केलं होतं. आता दोन मतदार संघातील उमेदवारांची नावं जाहीर करून विधानसभेत एकला चालो रेच्या दिशेनं एक पाऊल टाकलंय. एकीकडे मनसेनं दोन उमेदवारांची नावं जाहीर केली असली तरी राज ठाकरेंच्या निवास्थाना लगत असलेल्या वरळीतून मात्र उमेदवारी जाहीर केली नाही. आणि त्यामुळेचं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
advertisement
2009 साली वरळीत निवडणूक लढवली होती त्यावेळी 36 ते 38 हजार मतं मिळाली होती. या वेळी निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. वरळी हा हायप्रोफाईल विधानसभा मतदार संघ बनला आहे. राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वेळी मनसेनं आदित्य ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसंच वरळीतून उमेदवार उभा केला नव्हता. मात्र यावेळी मनसे वरळीतून उमेदवार देणार असल्याचं खुद्द राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. वरळी विधानसभेत मनसेकडून संदीप देशपांडेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेच्या तयारी लागण्याचा आदेश मनसैनिकांना दिले होते. मनसेच्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा प्रवेश निश्चित मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेच्या तयारी लागण्याचा आदेश मनसैनिकांना दिले होते. मनसेच्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा प्रवेश निश्चित मानला जात होता.
advertisement
आता राज ठाकरेंनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करुन आघाडी घेतली आहे. त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातंय. सत्ताधारी महायुतीवर दबाव टाकण्यासाठी तर ही खेळी नाही ना? तसेच वरळीतील उमेदवारीविषयी सस्पेन्स का ठेवला? या विषयी राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement