Summer Tips : उन्हापासून वाचण्यासाठी 3 गोल्डन रुल! डाएटिशियन ऋजुता दिवेकरने महिलांना दिल्या खास टिप्स..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Ditician rujuta divekar 3 magic summer tips : डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी ज्या महिला पेरी मेनोपॉज, मेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉजच्या स्थितीत आहेत. त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कारण या स्थितीत महिलांना उष्णतेचा जास्त त्रास होऊ शकतो.
मुंबई : महिलांच्या शरीराची रचना खूप क्लिष्ट असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात सारखे बदल होत असतात. म्हणूनच ऋतू बदलांमध्येही महिलांना त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. यातही उन्हाळ्यात मुळातच शरीराला खूप काळजीची गरज असते. कारण उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड राहाणं आणि शरीराचं तापमान संतुलित राहणं आवश्यक असतं.
यासाठीच डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी ज्या महिला पेरी मेनोपॉज, मेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉजच्या स्थितीत आहेत. त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कारण या स्थितीत महिलांना उष्णतेचा जास्त त्रास होऊ शकतो. या टिप्स तुम्ही फॉलो केल्यास तुमचे उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून संरक्षण होऊ शकते. चला तर मग पाहूया डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या काही सोप्या टिप्स.
advertisement
उन्हापासून वाचण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स..
सकाळी खास ड्रिंक प्या : सर्वात आधी तर तुमच्या डाएटमध्ये काही पदार्थ समाविष्ट करा. नारळ पाणी आणि सब्जा हे तुमच्या आहारात असले पाहिजे. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होतं, ज्यामुळे शरीर लवकर थकतं आणि आपल्याला आळस येतो. रुजुता दिवेकर यांनी रोज दुपारी 12 वाजण्यापूर्वी एक ग्लास नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
ऋजुता यांनी सांगितलं की, नारळ पाण्यात एक चमचा भिजवलेल्या सब्जा बिया टाकून प्या. यासाठी सब्जाचाच वापर करण्याचं त्यांनी सांगितलं. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम आणि मॅंगनीज असतात. हे तुमचे शरीर थंड, हायड्रेट ठेवते आणि पचन सुधारते.
दुपारच्या जेवणात हे पदार्थ सामील करा : ऋजुता यांनी सांगितलं की, दुपारच्या जेवणासोबत दही किंवा ताक नक्की घ्या. मात्र दही किंवा ताकामध्ये भाजलेली जिरेपूड नक्की घाला. कारण दही आणि जिरे दोन्ही थंड असतात. हे तुमचे पोट शांत ठेवतात.
advertisement
संध्याकाळच्या जेवणानंतर हे फळ खा : ऋजुताने सांगितले की, केळी पोटाच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. म्हणून त्यांनी संध्याकाळच्या जेवणानंतर केळी खाण्याचा सल्ला दिला. केळीमध्ये भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते तुमचे पोट हलके ठेवण्यास आणि सकाळी पोट साफ करण्यास मदत करू शकते.
Don’t let the March heat get to you. These 3 simple tips will keep you cool.#food #home #tips pic.twitter.com/iLADtcUa3m
— Rujuta Diwekar (@RujutaDiwekar) March 12, 2026
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 5:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हापासून वाचण्यासाठी 3 गोल्डन रुल! डाएटिशियन ऋजुता दिवेकरने महिलांना दिल्या खास टिप्स..







