'सर्च वॉरंट' दाखवलं आणि घराची झडती घेतली
कवठेमहांकाळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत चार व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी डॉक्टर म्हेत्रे यांना 'सर्च वॉरंट' दाखवले आणि घराची झडती घ्यायला सुरुवात केली. आम्ही तुमच्या घराती झडती घ्यायला आलोय, असं म्हणत संपूर्ण घर तपासायला सुरूवात केली.
advertisement
1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त
सिनेमात दाखवल्याप्रमाणे या बनावट अधिकाऱ्यांनी अत्यंत सफाईने आपले काम केले. त्यांनी घरातून सुमारे 16 लाख रुपयांची रोकड आणि जवळपास 1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे सांगितले. त्यानंतर तेथून पोबारा केला. मात्र, कारवाई सुरू असताना डॉक्टरांना संशय येत होता.
डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आला
आरोपींनी पोबारा केल्यानंतर डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छापा पूर्णपणे बनावट होता. त्यानंतर डॉक्टरांनी डोक्यालाच हात लावला. या तोतया आयकर अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.