Swimming: छोटा पॅकेट बडा धमाका! 5 वर्षांच्या पुणेकर आदित्यने राज्यस्तरावर केली 4 पदकांची कमाई
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Swimming: जलतरणपटू आदित्य स्वामी याने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पुणे: सामान्यपणे 5 वर्षांचं मुल पाहिजे तिकडे हसत-खेळत बागडत असते. मात्र, काही मुलं 5 वर्षांच्या वयात देखील आपल्या ध्येयाबाबत कमालीची फोकस्ड असतात. पुण्यातील आदित्य स्वामी, अशाच मुलांपैकी एक आहेत. पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या अवघ्या 5 वर्षांच्या आदित्यने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 3 सिल्व्हर आणि 1 ब्राँझ मेडल पटकावत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आदित्यचे वडील संतोष स्वामी यांनी लोकल 18शी बोलताना त्याच्या कामगिरी माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड येथील लहानगा जलतरणपटू आदित्य स्वामी याने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून आदित्यने जलतरणाला सरावाला सुरुवात केली होती. तो सध्या 'फर्स्ट जम्प स्विमिंग अकॅडमी'मध्ये सराव करत असून केवळ एका वर्षाच्या सरावातच त्याने हे यश मिळवलं आहे. आदित्य 'नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल'मध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे.
advertisement
आदित्यच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 साली द्रोणाचार्य स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात पहिल्यांदाच सहभागी होत आदित्यने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. पहिल्याच प्रयत्नात पदकाची कमाई झाल्यानंतर त्याच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी त्याच्या सरावाकडे विशेष लक्ष दिलं. याच तयारीचा परिणाम म्हणून राज्यस्तरीय स्पर्धेत आदित्यने चमकदार कामगिरी केली. एकूण पाच इव्हेंटमध्ये भाग घेतलेल्या आदित्यने चार प्रकारांत 3 सिल्वर आणि 1 ब्राँझ मेडलची कमाई केली
advertisement
23 ऑगस्ट रोजी बारामती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आदित्यने पाच इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल किक या प्रकारांचा यात समावेश होता. यापैकी चार प्रकरांमध्ये मेडल पटकावत आदित्यने आपली छाप उमटवली. राज्यस्तरीय पातळीवरील आदित्यने केलेल्या नेत्रदिपक कामगिरीमुळे जलतरण क्षेत्रात आदित्य स्वामीचं कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 15, 2025 3:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Swimming: छोटा पॅकेट बडा धमाका! 5 वर्षांच्या पुणेकर आदित्यने राज्यस्तरावर केली 4 पदकांची कमाई








