Letter Writing: पत्रप्रेमी आजोबा! 65 वर्षांत लिहिली 1 लाख पत्रं, पुण्याच्या सुहास जोशींचा अनोखा विक्रम
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Letter Writing: मुख्याध्यापक पदावर असताना सुहास जोशी यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी सतत संवाद साधला. पत्र हेच त्यांच्या संवादाचं माध्यम होतं.
पुणे: डिजिटल क्रांती होण्यापूर्वी 'पत्र व्यवहार' हे संवाद साधण्याचं मुख्य माध्यम होतं. सरकारी काम असो किंवा एकमेकांची ख्याली-खुशाली विचारणे, प्रत्येक बाबीसाठी पत्र लिहिलं जात होतं. हळूहळू डिजिटल क्रांती होत गेली आणि पत्र व्यवहार मागे पडत गेला. सध्याच्या काळात मोबाईल, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्याची पक्की सवय झाली आहे. मात्र, पुण्यातील 86 वर्षांचे निवृत्त मुख्याध्यापक सुहास जोशी याला अपवाद ठरले आहेत. जोशी यांनी आजवर तब्बल 1 लाख वेळा पत्रव्यवहार करून एक वेगळाच विक्रम केला आहे. सुहास जोशी यांनी लोकल 18शी बोलताना आपल्या अनोख्या छंदाची माहिती दिली.
सुहास जोशी हे आयुष्यभर शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. मुख्याध्यापक पदावर असताना त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटक यांच्याशी सतत संवाद साधला. पत्र हेच त्यांच्या संवादाचं प्रमुख माध्यम होतं. निवृत्तीनंतरही त्यांनी ही सवय जपली आणि ती एक संस्कारमूल्य बनवली. त्यामुळे आज वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या पत्रलेखनाचा आकडा तब्बल 1 लाखांवर पोहोचला आहे.
advertisement
पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी केवळ वैयक्तिक संवादच नाही तर प्रशासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींशीही संपर्क साधला. अनेकदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी, कुणाच्या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा एखाद्या कल्पनेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रांचा आधार घेतला.
advertisement
टपाल विभागाकडून करण्यात आला गौरव
मागील 65 वर्षांपासून पत्रलेखनचा छंद जोपासणाऱ्या सुहास जोशी यांचा टपाल विभागाकडून गौरव करण्यात आला आहे. पत्रलेखनाच्या अनोख्या कामगिरीचा सन्मान म्हणून टपाल विभागाच्या टपाल तिकीटावर सुहास जोशी यांचं छायाचित्र आता दिसणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 15, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Letter Writing: पत्रप्रेमी आजोबा! 65 वर्षांत लिहिली 1 लाख पत्रं, पुण्याच्या सुहास जोशींचा अनोखा विक्रम