TRENDING:

धक्का लागला म्हणून जीव घेतला, कवलापूर यात्रेत भयंकर प्रकार, सांगलीत खळबळ

Last Updated:

Sangli News: कवलापूर यात्रेत स्थानिक नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: सध्या गाव खेड्यांत यात्रांचा जल्लोष सुरू असतानाच सांगलीच्या कवलापूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली. सिद्धेश्वर यात्रेत एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. यातून डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून करण्यात आला. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय 34, रा. कवलापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित हल्लेखोर रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय 24, रा. कवलापूर, मूळ रा. भोसे, ता. मिरज) याला अटक केली आहे.
Sangli News: यात्रेत धक्का लागल्याचा राग, खाली पाडलं अन् डोक्यात..., कवलापुरात भयंकर प्रकार
Sangli News: यात्रेत धक्का लागल्याचा राग, खाली पाडलं अन् डोक्यात..., कवलापुरात भयंकर प्रकार
advertisement

मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेत तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. यात्रेनिमित्त परिसरात मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतून जाताना विश्वास आणि संशयित रोहित यांचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळही झाली. यावर संतापलेल्या रोहितने विश्वासला धक्का देऊन खाली पाडले आणि रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात घातला.

advertisement

कापड हटवण्यासाठी मंडपावर चढला, रवीसोबत भयंकर घडलं, सोलापूर हळहळलं

विश्वास जीवाच्या आकांताने ओरडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली आणि रोहितला पकडून ठेवले. विश्वासला गंभीर जखमी अवस्थेतच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विश्वास हा कवलापूर-कुमठे फाटा रस्त्यावरील हॉटेलमध्ये वेटर होता.

दरम्यान, याप्रकरणी सूरज भूपाल सुतार याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपासणी करत आहेत.

advertisement

यात्रेत नियमांचे उल्लंघन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

सध्या जाहीर कार्यक्रमांना रात्री 10 वाजेपर्यंतच प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. मात्र, कवलापूर यात्रेत स्थानिक नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवले होते. पोलिसांनी देखील या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने मध्यरात्रीपर्यंत याठिकाणी वर्दळ होती. त्यातच ही घटना घडली. आता नियमांचे पालन केले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
धक्का लागला म्हणून जीव घेतला, कवलापूर यात्रेत भयंकर प्रकार, सांगलीत खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल