सांगलीतील गावभागातील सांभारे गणपतीची प्रथेनुसार दशमीच्या दिवशी स्थापना करण्यात आली. सांभारे गणपती बारा फुट उंच आणि नऊ फुट रुंदीचा आहे. ही संपूर्ण मूर्ती पांगीरीच्या लाकडापासून बनवली आहे. तिचे वजन दीड टन इतके आहे. अतिशय सुरेख आणि डौलदार मूर्ती म्हणून सांभारे गणपती प्रसिद्ध आहे. 1899 सालापासून येथे गणेशाची स्थापना होते. येथील गणपतीचे विसर्जन केलं जात नाही.
advertisement
सांगलीत 1899 साली कै. आबासाहेब सांभारे यांनी ही परंपरा सुरु केली आहे. पूर्वी या ठिकाणी शाडूच्या गणेशाची स्थापना होत असे. मात्र एक वेळी मूर्ती दुखावली त्यामुळे तिची प्रतिष्ठापणा होऊ शकली नाही. प्रथेप्रमाणे गणपती बसवायचा म्हणून लाकडी मूर्ती तयार करण्यात आली. मात्र, ती मूर्ती दशमी दिवशी तयार झाली, त्यामुळे दशमी दिवशी या ठिकाणी गणपती बसवला जातो. सण 1952 पर्यंत या मूर्तीची शहरातून मिरवणूक निघत होती. पण, त्यानंतर रस्त्यावर विजेचे खांब उभे राहिल्याने आणि मूर्ती मोठी असल्याने मिरवणूक काढणे बंद झाले. गणेश चतुर्थीनंतर दशमीला गणेशाची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर अनंत चतुर्थीपर्यंत मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम होतात. संस्थानच्या गणपती मंदिरात येणारे सर्व गवई या मंदिरात हजेरी लावून आपली कला सादर करीत असत. तसेच लोकमान्य टिळक यांच्या सारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी येवून सांबारे गणपतीचे दर्शन घेतले आहे.
गणपतीसमोर यापूर्वी अनेक दिग्गज गायकांनी आराधना केल्याची परंपराही आहे. लता मंगेशकर यांच्यापासून अगदी उस्ताद अलदिया खान, अब्दुल करीम खान, मोगुबाई कुर्डीकर, कागलकर बुवा, दीनानाथ मंगेशकर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे या गणेशाची परंपरा पाहता सगळ्यांसाठीच हा बाप्पा आकर्षणाचा विषय आहे.
सोमवार भाग्याचा! या 5 राशींना सरकारी योजनांचा लाभ; डबल खुशखबर मिळणार
सन 1888 साली दुर्मिळ अशा पांगिराच्या झाडाच्या लाकडापासून तिसऱ्यांदा तिसरी मूर्ती तयार करण्यात आली. पुण्याचे गोविंद सुतार आबासाहेब यांच्याकडे औषधोपचारासाठी आले होते. त्यांनी मूर्तीचा आराखडा तयार केला. वासुनाना घाडगे यांनी कागदाचा लगदा वापरून मूर्तीला आकार दिला. चौदा फूट उंच व नऊ फूट रुंदी तसेच दीड टन वजन असलेली गणेशमूर्ती सहा महिन्यात तयार करण्यात आली.
1899 साली तिसऱ्या मूर्तीची पहिल्यांदा प्रतिष्ठापना करण्यात आली. सांगलीतील हे पहिले गणेशोत्सव मंडळ. सांभारे वाड्याच्या मध्यावर मूर्ती ठेवली. सन 1928 साली पहिल्यांदा ट्रकतून मिरवणूक काढली. ही मिरवणूक माऊती चौक, बालाजी चौक, राजवाडा चौक, पटेल चौक, पंचायतन गणपती मंदिर, टिळक चौक, कुंभार खिंड, सांभारे वाडा या मार्गे काढली. 1952 पर्यंत मिरवणूक सुरू होती. परंतु, त्यानंतर मिरवणूक मार्गावरील विजेचे खांब व तारा मिरवणुकीस अडथळा ठरल्याने मिरवणुकीमध्ये खंड पडला, तो तब्बल 70 वर्षे.
Pitru Paksha 2024: पितृपक्षात पितरांसाठी हे शुभ काम केल्यास मिळेण विशेष आशीर्वाद
यंदा मात्र या गणपतीची पूर्वीच्याच थाटामध्ये मिरवणूक निघणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी सांभारे यांच्या पिढीकडून सुरू आहे. लेझीम, टाळ, मृदुंग, पारंपारिक वेष-भूषांसह महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. या गणपतीची मूर्ती माऊती चौकाजवळील सांभारे वाड्यात पाहायला मिळते.