खासदार संजय राऊतांनी व्हिडिओ केला शेअर
दरम्यान, या विजयाच्या आनंदात भाजपकडून जल्लोष सुरू असतानाच, राजकीय वातावरण तापवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राहुल ढिकले यांच्यातील कथित संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील भाजप कार्यालयात विजयाचा आनंद साजरा होत असताना, मंत्री महाजन यांच्या शेजारी बसलेले आमदार ढिकले यांच्याशी ते कानगोष्टी करताना या व्हिडीओत दिसतात.
advertisement
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आमदार ढिकले हे “साने निवडून आला म्हणजे अवघड आहे, तुमची कृपा,” असे म्हणताना ऐकू येतात. यावर मंत्री गिरीश महाजन काही आक्षेपार्ह विधान करत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या संवादाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी “आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार?” असे कॅप्शन देत भाजपवर टीका केली आहे.
मतदान टक्केवारीत घट, तरीही भाजपला यश
यंदाच्या महापालिका निवडणुकीत ५६.७६ टक्के मतदान झाले, जे २०१७ च्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे निकाल वेगळे लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच आयाराम-गयाराम, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पक्षात प्रवेश दिल्याचे आरोप, तपोवन वृक्षतोड प्रकरणातील वादग्रस्त भूमिका आणि अंतर्गत बंडखोरी यांमुळे भाजपला फटका बसू शकतो, अशी चर्चा होती.
