शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आतापर्यंत आम्ही हजारो नाव दुबार नावासमोर आणली असल्याचे राऊत यांनी म्हटले. आमच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांनी हा प्रश्न त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना विचारलं पाहिजे. ऐरोली मध्ये आणि बेलापूर मध्ये मिळून साधारण 70 हजार दुबार मतदार असून पैसे खाऊन अधिकाऱ्याने ही नावे मतदारयादीत घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक मध्ये तीन लाख 53 हजार मतं आम्ही बाहेर काढली. लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांनी मतदान केल्यामुळे शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले हे संजय गायकवाड सांगत आहेत, असे सांगत राऊत यांनी महायुतीवरही हल्लाबोल केला. आम्ही लवकरच 96 लाख दुबार मतदारांची यादी प्रकाशित करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणी केली नाही. निवडणुका याद्या दुरुस्त करा, यादी मधील घोटाळा दुरुस्त करा अशी मागणी असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
advertisement
भाजप प्रेमावर महेश कोठारेंना टोला...
मुंबईचा महापौर हा भाजपचा होईल असे दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांनी म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी म्हटले की, ते नक्की मराठी आहेत ना, याची शंका वाटते. कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपचे लोकांनी बघितले नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, महेश कोठारे यांनी असं काही बोलू नये. तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलत तर तात्या विंचू मराठी माणूस होता रात्री चावा घेईल आणि गळा दाबेल असा चिमटा त्यांनी काढला.
महेश कोठारे काय म्हणाले होते?
मागाठाणे येथे दिवाळी पहाटनिमित्तानं खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना महेश कोठारे यांनी महानगरपालिका निवडणुकांवर भाष्य केलं. त्यांचा भाजपला पाठिंबा असल्याचे संकेतच दिले. महेश कोठारे म्हणाले, "हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे. मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे.
महेश काठारे पुढे म्हणाले, "पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे. आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे. पण यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल", असंही महेश कोठारे म्हणाले.