TRENDING:

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्वीस्ट येणार? पोलिसांना सापडला 'तो' मोबाईल फोन

Last Updated:

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. पोलिसांना महत्त्वाचा पुरावा सापडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव:  बीडमधील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. पोलिसांना महत्त्वाचा पुरावा सापडला असून आता एक नव्हे तर दोन हत्या प्रकरणात नवा उलगडा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
News18
News18
advertisement

संतोश देशमुख हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा आतापर्यंत झाला आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन चाटे आणि इतर आरोपींविरोधात सापडलेल्या पुराव्यातून आणि इतर माहितीवरून संतोष देशमुख यांच्यावर एका महिलेसोबत अनैतिक संबंध, तिच्या अत्याचार करण्यात आल्याचा खोटा आरोप करण्यात येणार होता. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. या कटात सहभागी असल्याचा कथित संशय असलेल्या मनिषा बिडवे या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले.

advertisement

मनिषा बिडवे या महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मनिषाचे प्रेत आळ्या लागलेल्या अवस्थेत सापडल्याचे समोर आले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मयत महिलेचा सहभाग असल्याचा आरोपानंतर हे हत्या प्रकरण चर्चेत आले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगळं वळण?

आता, मयत मनीषा बिडवे खून प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. घटनेतील सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती आल्याने काही गोष्टींचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. मयत मनिषा बिडवेचा मोबाईल पोलिसांना सापडला आहे. आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी मोबाईल सापडला. मोबाईल सापडल्याने महिला कोणाच्या संपर्कमध्ये होती हे उघड होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात मनीषा होती का याचा ही पोलीस घेणार आहेत. पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरा गावात दाखल झाले आहेत. आरोपीच्या गावच्या परिसरात आरोपी व मनीषा बिडवे बाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे.

advertisement

ती महिला मनिषा नव्हे?

संतोष देशमुख यांना खोट्या आरोपात अडकवण्याच्या कटातील महिला ही मनिषा नसल्याचेही म्हटले जात आहे. धनंजय देशमुख यांनीदेखील ही बाब स्पष्ट केली होती. तर, अंजली दमानियांच्या आरोपामुळे मनिषा बिडवे हत्या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता हत्या झालेल्या मनिषा बिडवेचे संबंध, संपर्क देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत होते का, याचा उलगडा होणार आहे.

advertisement

मनिषाच्या हत्येचे कारण काय?

मनिषा बिडवे यांच्या मागील ड्रायव्हर असलेल्या रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले याच्याशी मयत महिलेचे शारीरिक संबंध होते. मात्र, मनिषाने त्या संबंधांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून रामेश्वरला 5 लाख रुपये देण्याची मागणी केली, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे रामेश्वरने रागाच्या भरात लोखंडी हातोडीने तिच्या डोक्यात वार करून खून केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्वीस्ट येणार? पोलिसांना सापडला 'तो' मोबाईल फोन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल