अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावर राहु नये, अशी आमची मागणी असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी सांगितले आहे. आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींना देखील तेच सांगायचे आहे की त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका. पक्षपातीपणे चौकशी होऊ द्या, असे सोळंके यांनी सांगितले आहे.
advertisement
सुदर्शन घुले,सागळेंच्या अटकेनंतर देशमुखांच्या भावाला मोठा संशय, पुण्यात आश्रय...
प्रकाश सोळंके यांनी पालकमंत्रिपदावरही मोठं भाष्य केलं आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती,जातीय सलोखा बिघडलेला आहे त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे घ्याव,असे सोळंके यांनी म्हटलं आहे.
धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ जरांगेंना मोठा संशय, पुण्यातून राजकीय पाठबळ...
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले प्रमुख आरोपी आहे तर सुधीर सांगळे हा सहआरोपी आहेत.या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खरं तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे दोन दिवस भिवंडीमध्ये होते. सरपंचाची हत्या केल्यानंतर तब्बल 25 दिवसांनी हे आरोपी फरारी होते. अखेर त्या तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोन आरोपी भिवंडीनंतर पुण्यात गेले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना पुण्यातून अटक केली आहे. यासोबत संतोष देखमुख यांचं लोकेशन देणारा एक संशयितही पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे.
