advertisement

Santosh Deshmukh : सुदर्शन घुले,सागळेच्या अटकेनंतर देशमुखांच्या भावाला मोठा संशय, पुण्यात आश्रय देणारा...

Last Updated:

पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन प्रमुख आरोपींना अटक झाली आहे. त्यामुळे मी या आधीही म्हणालो होतो तपास व्यवस्थित सुरू आहे.

santosh deshmukh murder case update
santosh deshmukh murder case update
Santosh Deshmukh murder case update : परभणी : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुणयातून अटक करण्यात यश आलं आहे. या दोन्ही आरोपींच्या अटकेनंतर आता संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.यावेळी धनंजय देशमुख यांनी या आरोपींच्या अटकेनंतर मोठा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणात मोठी खळबळ माजली आहे.
पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन प्रमुख आरोपींना अटक झाली आहे. त्यामुळे मी या आधीही म्हणालो होतो तपास व्यवस्थित सुरू आहे. मात्र सर्व आरोपी पुण्यातच का सापडत आहेत? कुणीतरी त्यांना आश्रय देणारा असेल? असा संशय व्यक्य करत धनंजय देशमुख यांनी त्या आश्रय दात्याला ही शोधलं पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यासोबत तिसरा आरोपी सुद्धा लवकरच सापडेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले प्रमुख आरोपी आहे तर सुधीर सांगळे हा सहआरोपी आहेत.या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खरं तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे दोन दिवस भिवंडीमध्ये होते. सरपंचाची हत्या केल्यानंतर तब्बल 25 दिवसांनी हे आरोपी फरारी होते. अखेर त्या तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोन आरोपी भिवंडीनंतर पुण्यात गेले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना पुण्यातून अटक केली आहे. यासोबत संतोष देखमुख यांचं लोकेशन देणारा एक संशयितही पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement

परभणीत आज महामोर्चा

दरम्यान मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरूंना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह, बीड लोकसभा खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक नेतेमंडळी ही राहणार उपस्थित राहणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : सुदर्शन घुले,सागळेच्या अटकेनंतर देशमुखांच्या भावाला मोठा संशय, पुण्यात आश्रय देणारा...
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement