परभणीत मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना यांच्या अटकेवर बोलतान जरांगे म्हणाले की, पुण्यातून का अटक होतेय. सगळेच आरोपी पुण्यातून का सापडतात, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच याचा अर्थ सरकारचा आणि सरकारमधील कुठल्या तरी मंत्र्याचा यांना राजकीय पाठबळ आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
advertisement
सुदर्शन घुले,सागळेंच्या अटकेनंतर देशमुखांच्या भावाला मोठा संशय, पुण्यात आश्रय...
जरांगे यांनी पुढे बोलताना देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. कारण आरोपींना आतापर्यंत कुणी सांभाळलं, त्याला सु्द्धा अटक झाली पाहिजे. देशमुखांची हत्या झाली आणि त्यांना आरोपींना सांभाळण्यात मोठेपण वाटते हे कोण नेमके आहेत?यांना देखील शोधलं पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तसेच हे सगळच्या सगळं रॅकेट असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खंडणी आणि हत्या प्रकणातील सर्व आरोपींची चौकशी केल्यावर सरकारमधून पाठबळ देणारे सगळेच्या सगळे समोर येणार आहेत.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले प्रमुख आरोपी आहे तर सुधीर सांगळे हा सहआरोपी आहेत.या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खरं तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे दोन दिवस भिवंडीमध्ये होते. सरपंचाची हत्या केल्यानंतर तब्बल 25 दिवसांनी हे आरोपी फरारी होते. अखेर त्या तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे दोन आरोपी भिवंडीनंतर पुण्यात गेले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना पुण्यातून अटक केली आहे. यासोबत संतोष देखमुख यांचं लोकेशन देणारा एक संशयितही पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येचं नवं कनेक्शन समोर,
परभणीत आज महामोर्चा
दरम्यान मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरूंना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह, बीड लोकसभा खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक नेतेमंडळी ही राहणार उपस्थित राहणार आहेत.
