छत्रपती संभाजीनगर शहरातील आस्था जनविकास संस्थेमार्फत शहरांमध्ये साडी बँकेची सुरुवात झाली आहे. डॉ.आरती श्यामल जोशी यांनी 2016 साली हा उपक्रम सुरू केला. दानात आलेल्या या साड्या गरजू महिलांपर्यंत पोहोचतात. साडी बँक ही संकल्पना अशी आहे. दुर्बल घटकातील महिला होतकरू महिला आणि ज्या कष्टकरी समाजातल्या महिला आहेत ज्यांना साडी घेणे एक स्वप्न असतं ज्यांना साडी घेणे परवडत नाही, अशा महिलांपर्यंत आम्ही नव्या कोऱ्या साड्या पोहोचवतो .
advertisement
साडी बँकेची सुरुवात अशी झाली की, कचरा वेचणाऱ्या महिलांसाठी मी एक प्रकल्प राबवत होते. तेव्हा मला असं लक्षात आलं की कचऱ्या मधला कपडा उचल मला त्या स्वच्छ धुतात आणि वापरतात. त्या कपड्याची किंमत त्यांच्या लेखी खूप आहे. आणि त्यावेळेस माझ्या मनात असा विचार आल की आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात त्यासाठी आपल्याला कोणी भेटत असते म्हणून दिलेला असतात आहे आहेर मध्ये देतात किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमांमध्ये गेला तर आपल्याला त्या साडे येत असतात. अशा साड्या आपल्याकडे भरपूर असतात आणि त्या आपण कधी वापरत नाहीत. त्यामुळे मी सुरुवात स्वतःपासून केली आणि ज्या नव्या कोऱ्या साड्या होतात त्या या महिलांना देण्याचं काम केलं आणि तेव्हा झालेला त्या महिलांना आनंद मी शब्दात सांगू शकत नाही.
त्यानंतर मी माझ्या नातेवाईकांना आमच्या संस्थेला याबद्दल सांगितलं आणि आणि त्यांनी मला भरपूर असा प्रतिसाद दिला. पुढे असं लक्षात आलं की आमचे हात कमी पडत आहेत. कष्टकरी समाज हा फक्त कचरा वेचणारा नाहीतर त्यामध्ये अनेक असे दुर्बल घटक येतात. आणि त्यानंतर आम्ही प्रसार माध्यमांमधून प्रसिद्धी करायला सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून आम्हाला भरघोसाचा लोकांचा विशेष करून महिलांचा प्रतिसाद मिळाला. कारण की लोकांकडे खूप अशा साड्या होत्या ज्या वापरत नाहीत त्या फेकून देतात पण त्या साड्या त्यांनी आम्हाला आणून दिल्या. गेल्या दहा वर्षापासून साडी बँकेचे काम खूप वाढत गेलेला आहे.
आज आमच्या साडी वाटपाचाच वाकड आहे, तो 85 हजार पेक्षा देखील जास्त आहे. आणि जी पण साडी आमच्याकडे प्रत्येक साडीची नोंद आमच्याकडे आहे. ज्या पण महिलेला आम्ही साडी देतो त्या महिलेला आमच्या संस्थेकडून एक सर्टिफिकेट देखील देण्यात येतं. या साडी बँकेसाठी आम्हाला अनेक ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या मदत करतात किंवा इतर ज्या महिला आहेत त्या देखील आम्हाला मदत करत असतात आणि अशा पद्धतीने आमचं हे साडी बँक सुरू झाला आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही अनेक महिलांना साड्या वाटपाचं काम केलेलं आहे.