नेमका प्रकार काय?
आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात एका नवीन साडी सेंटरचे उद्घाटन झाले आहे. या दुकानाची जाहिरात गेल्या तीन महिन्यांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. ५ हजार रुपयांची साडी ५९९ रुपयांत मिळणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, रविवारी सकाळी १० वाजल्यापासूनच हजाराहून अधिक महिलांनी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या.
दुकानाचे शटर उघडले अन् अनर्थ घडला
advertisement
दुकान उघडताच साडी मिळवण्याच्या घाईत महिलांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी शेकडो महिला दरवाजातून आत घुसल्यामुळे प्रचंड चेंगराचेंगरी झाली. गर्दी आणि ढकलाढकलीमुळे श्वास गुदमरून ३ महिला जागीच बेशुद्ध पडल्या. गोंधळ इतका होता की, अनेक महिलांची लहान मुले त्यांच्यापासून वेगळी झाली, ज्यामुळे परिसरात एकच रडारड आणि ओरडाओरड सुरू झाली.
पोलिसांचा हस्तक्षेप आणि रस्त्यावर कोंडी
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले. या गोंधळामुळे त्रिमूर्ती रोडवर तब्बल चार तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. विशेष म्हणजे, काल एवढा मोठा अपघात होऊनही आजही या साडी सेंटरबाहेर सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी कायम आहे.
