TRENDING:

Education: मुलगी शिकली प्रगती झाली! सावित्रीच्या लेकीनं गावासमोर ठेवला आदर्श

Last Updated:

Education: नांदप या गावात मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: सध्याच्या घडीला महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही मुलींना उच्च शिक्षण घेण्यापासून थांबवलं जातं. कल्याण तालुक्यापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदप या गावात देखील अशीच परिस्थिती होती. मात्र, गावात लग्न होऊन आलेल्या शिक्षणप्रेमी महिलेनं संपूर्ण गावाचा दृष्टीकोनचं बदलून टाकला आहे. सारिका शेलार असं महिलेचं नाव असून त्या कोचिंग क्लास घेण्याचं काम करतात.
advertisement

नांदप या गावात मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं. मुलगी लिहायला- वाचायला शिकली की तिचं शिक्षण पूर्ण झालं, अशी परिस्थिती या गावात होती. साधारण 20 वर्षांपूर्वी सारिका लग्न करून नांदपमध्ये आल्या. सारिका यांची आई शिक्षिका असल्याने त्यांच्या घरात शिक्षणाचं वातावरण होते. सारिका यांना नांदपमधील परिस्थिती एकदम उलटी वाटली. गावातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली.

advertisement

Hadga Bhondla: पारंपरिक गाणी आणि मुलींचं रिंगण, कोल्हापूरच्या शाळेनं नवरात्रीत जपली ती खास परंपरा, Video

सारिकां यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी अनेक पालकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या मुलींना उच्चशिक्षित करून गावासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला. त्यामुळे आसपासच्या गावातील मुलीच नाही तर मुलं देखील त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये शिकण्यासाठी येतात. त्यांनी गावातील अनेक महिलांना देखील मार्गदर्शन करून स्वावलंबी होण्यास मदत केली आहे.

advertisement

गावाकडच्या महिलेने रांधा-वाढा-उष्टी काढा यामध्ये अडकून राहू नये, असं सारिकांना यांना वाटतं. प्रत्येक स्त्रीने शिक्षण करून स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. महिला कमावती असेल तर समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपोआपो बदलतो, असं सारिका शेलार यांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Education: मुलगी शिकली प्रगती झाली! सावित्रीच्या लेकीनं गावासमोर ठेवला आदर्श
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल