खरं तर गावाला पाणी मिळत नसल्याने सरपंच मंगेश साबळे याने हा कारनामा केला आहे.आम्हाला पाणी द्यावे अशी महिलांची मागणी मात्र महिलांच्या जागी सरपंच साडी घालून जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाला आहे. गावाला पाणी द्यावे यासाठी त्याने थेट महिलांचे रूप धारण केले आहे. जेणेकरून जिल्हा परिषद कार्यालयाला जाग येईल. या आंदोलनानंतर आता गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल,अशी अशा गावकऱ्यांना आहे.
advertisement
दरम्यान सरपंच मंगेश साबळे याच्या आंदोलनाचा व्हिडिओ आता व्हायरल होते. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
या व्हिडिओत मुख्यमंत्री लाडक्या बहिणींनी डोक्यावर पाणी आणायला लावतायत.आणि म्हणून महिलांच्या वतीने बोलतोय, जल जीवन मिशन ही 1 कोटी 80 लाखाची योजना केंद्राची आहे.पाचवर्ष झाले काम सूरू होऊन अजून काम सूरू झाले नाही. म्हणून सीईओंनी तत्काळ मिटींग बसवावी. जल जीवन मिशनचा आढावा घ्यावा, अशी मागणी मंगेश साबळे यांनी केले आहे.
