संकटांशी डोळ्यांत डोळे भिडवत उभी राहणाऱ्या जिद्दीची कहाणी म्हणजे वैभवी देशमुखचे नाव घ्यावे लागेल. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर उभ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गाव, तालुका नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा आणि राज्यभर या हत्येने खळबळ उडवली. देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या आंदोलनात, न्याय मागणीच्या लढ्यात वैभवी अग्रेसर होती .
advertisement
वडिलांच्या निधनानंतरचा मानसिक आघात पचवतानाच वैभवीने आपलं शैक्षणिक ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं. बारावीची परीक्षा तोंडावर असताना संपूर्ण घर संकटात असतानाही वैभवीने हार मानली नाही. अनेकदा पोलिस चौकशी, आजूबाजू निर्माण झालेली कष्टदायक परिस्थिती या सगळ्या त्रासदायक पार्श्वभूमीतून वाट काढत वैभवीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर आजच्या बारावीच्य निकालात उत्तुंग यश संपादन केले.
वैभवीला किती टक्के गुण?
वैभवीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवत आपली जिद्द सिद्ध केली आहे. तिच्या या यशाने केवळ देशमुख कुटुंबासाठी नव्हे तर बीड जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे. दुःख, अन्याय, आणि संघर्षाच्या छायेतून वैभवीने आपली वाट निर्माण केली. वैभवीने बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली. वैभवीला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले.
वैभवीला डॉक्टर बनवण्याचे होते स्वप्न....
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना वैभवीला डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने घवघवीत यश मिळवले. वैभवीने बायोलॉजीमध्ये 98 टक्के गुण मिळवले. तर, फिजिक्समध्ये 83 आणि केमिस्ट्रीत 91 गुण मिळाले. गणितामध्येही वैभवीला 94 गुण मिळाले.
वडिलांच्या आठवणी आणि न्यायासाठी लढण्याची जबाबदारी मनात घेऊन वैभवी आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्यांनी कौतुकाची थाप दिली आहे.
इथं पाहा बारावीचा निकाल...
इतर संबंधित बातमी :