Maharashtra HSC Result 2025 Live : बारावीचा पहिला आणि वेगवान निकाल एका क्लिकवर, इथं पाहा HSC Result

Last Updated:

Maharashtra HSC Results Live : शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

Maharashtra HSC Result 2025 Live
Maharashtra HSC Result 2025 Live
मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा करिअरला दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.  शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेत एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता निकाल पाहण्यासाठी आपला रोल नंबर आणि आईचे नाव (मूळ प्रमाणपत्रानुसार) आवश्यक असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर, आपली डिजिटल गुणपत्रिका DigiLocker वरून डाउनलोड करता येईल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेत एकूण 14,27, 085 नियमित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या 36,133 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 697 विद्यार्थी उत्तीर्ण झाले
advertisement

>> बारावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process)

1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. ‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा
3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.

इथं पाहा झटपट बारावीचा निकाल...

>> महाराष्ट्र बोर्डासह कोणत्या वेबसाइटवर पाहता येईल निकाल?

advertisement
बारावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डासह इतरही काही वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तुम्ही निकाल पाहण्यासाठी पुढील वेबसाइटचा वापर करू शकता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra HSC Result 2025 Live : बारावीचा पहिला आणि वेगवान निकाल एका क्लिकवर, इथं पाहा HSC Result
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement