बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी केली होती. हत्या केल्यानंतर कृष्णा आंधळे हा फरार झाला. एक वर्ष उलटूनही कृष्णा आंधळे तपासी यंत्रणांना गुंगारा देत आहे. याबद्दल कोर्टाने देखील तपासी यंत्रणांना कृष्णा आंधळेला काय झालं.. अहवाल द्या असे आदेश दिले. त्याच्या संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र धनंजय देशमुख यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
कृष्णा आंधळे तीन वेळा गावात येऊन गेला
मागील सहा महिन्यात कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या मूळ गावी येऊन गेला. तो कोणाला भेटलाा? नेमकं त्याने काय केलं असे प्रश्नही उपस्थित केले असून तपासी यंत्रणाला या संदर्भातील माहिती दिल्या धनंजय देशमुख यांनी सांगितले. कृष्णा आंधळे आणि आरोपींची टीम यांच्याकडून देशमुख कुटुंबाला धोका आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करत असल्यासही धनंजय देशमुख यांनी सांगितले..
धनंजय देशमुख काय म्हणाले?
फरार कृष्णा आंधळे गावात तीन वेळा आला.
गावात येतो मग तपासणी यंत्रणा का सापडत नाही?
देशमुख कुटुंबाला आंधळे कडून धोका?
कृष्णा आंधळे सापडत नाही तपासी यंत्रणांचा अपयश
कृष्णा शामराव आंधळे (वय 30 या. मैंदवाडी धारूर तालुका) येथील रहिवासी असून या संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पथक करण्यात आले होते एस आय टी व सीआयडी स्थानिक गुन्हे शाखा असे पथके आरोपींला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रकाश सोळंके काय म्हणाले?
धनंजय देशमुख यांनी केलेला जागा नंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी चिंता व्यक्त करत तपासी यंत्रणेचे अपयश आहे की आरोपीचा बचाव करत आहेत असा संशय ही व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुख्यमंत्रांनी वयक्तिक तपास संदर्भात लक्ष देण्याची मागणी करणार आहे, असं प्रकाश सोळके म्हणाले.
कृष्णा आंधळेबद्दल अफवा काय?
- कृष्णा आंधळे इतर राज्यांमध्ये गेला
- नाशिक येथे पहिल्याचा देखील अफवा
- प्रयागराज कुंभमेळ्यात वेशांतर करून राहतो
- तृतीयपंथी वेशांतर करून राहतो.
- कृष्णा आंधळे जिवंतच नाही
कृष्णा आंधळे गेला कुठे?
कृष्णा आंधळेसंदर्भात बीड पोलिसांना विचारले असता तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला आमचा तपास सुरू आहे एवढेच उत्तर दिले. त्यामुळे.कृष्णा आंधळे याला तपासी यंत्रणांनी फरार घोषित केले त्याची माहिती सांगणारा बक्षीसही घोषित केले मात्र अद्याप पर्यंत त्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र धनंजय देशमुख यांनी केलेल्या दाव्याने तपासी यंत्रणांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमका कृष्णा आंधळे गेला कुठे याचे उत्तर सीआयडी बीडचे पोलीस आणि एसआयटी देणार का?
