लालासाहेब तांबाडे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, सतत ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढल्यामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. या रोगामुळे पानांवर पिवळसर डाग दिसतात आणि पुढे संपूर्ण पान करपण्याची शक्यता असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब या मिश्रणाची 15 ग्रॅम मात्रा 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर फवारणी केल्यास रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
advertisement
Success Story : कारले शेती गोड प्रयोग, वर्षाला 15 लाखांचं उत्पन्न, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया!
तसेच भुरी रोगाचाही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. भुरीमुळे पानांवर आणि घडांवर पांढऱ्या चूर्णासारखा थर दिसतो, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी टेट्राकोनॅझोल 10% ईसी 5 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा हेक्झाकोनॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
द्राक्ष बागायतदारांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन नियमित पाहणी करावी आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणीचे नियोजन करावे. योग्य व्यवस्थापन केल्यास केवडा आणि भुरी या दोन्ही रोगांवर नियंत्रण मिळवून द्राक्षातून भरघोस उत्पन्न घेणे शक्य आहे, असा विश्वास तांबाडे यांनी व्यक्त केला.





