कसा झाला थरकाप उडवणारा अपघात
सारिका सुतार असं मयत शिक्षिकेचं नाव आहे. त्या सातारा जिल्ह्याच्या संगममाहुली येथील रहिवासी होत्या. तर ईश्वरी सुतार असं जखमी महिलेचं नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सारिका सुतार या अजंठा चौकातील एका खासगी क्लासमध्ये शिकवण्यासाठी जात होत्या. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून अजंठा चौकाकडे जात असताना हा अपघात झाला.
advertisement
सारिका आणि ईश्वरी सुतार दुचाकीने अजंठा चौकाकडे जात असताना समोरून उसाचा ट्रॅक्टर आला. याचवेळी सर्व्हिस रोडवर येण्यासाठी एक क्रेटा कार अचानक पुढे आली. त्या कारला चुकवताना चालकाने ट्रॅक्टर उजवीकडे वळवला. त्यामुळे समोरून येणारी दुचाकी मोठ्या खड्ड्यात आदळली. त्या धक्क्याने दुचाकीवर मागे बसलेल्या सारिका सुतार खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे मागील चाक गेले. त्या जागीच ठार झाल्या तर दुसरी महिला जखमी झाली.
बेशिस्त वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
या अपघातानंतर साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. याचबरोबर, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील बेशिस्त वाहतूक आणि अव्यवस्थित पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अनेक मोठी वाहने महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूंनी बेकायदेशीरपणे पार्क केली जातात. यामुळे रस्ता अत्यंत अरुंद होतो. परिणामी वाहनांना वळण घेणं धोकादायक ठरते.
