TRENDING:

Satara: मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी पुतण्याची साताऱ्यात मोठी खेळी,काकांच्या पक्षातील बडा मासा गळाला

Last Updated:

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा :  राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, हे इनकमिंग आजही सुरूच आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान साताऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाने शरद पवारांना मोठा झटका दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार, मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला, या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नगरपालिका निवडणुकांच्या काळामध्ये झालेल्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा फटका मानला जातं आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा असल्याचं बोलले जात आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश रहिमतपूर येथे पक्षप्रवेश पार पडला.

advertisement

काय म्हणाले अजित पवार? 

अजित पवार म्हणाले, सुनील माने यांचा प्रवेश हा पक्षप्रवेश मानत नाही ही घरं वापसी आहे. कार्यकर्ता लोकांच्या लक्षात राहिला पाहिजे तो लोकांच्यात रमला पाहिजे. पुणे जिल्ह्यान दिलं नाही तेवढं सातारा जिल्ह्यानं भरभरून प्रेम दिलं.

सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय

सुनील माने यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला. सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र राष्ट्रवादीमध्ये दुफळी पडल्यानंतर सुद्धा सुनील माने हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत काम करत होते. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील माने यांना राष्ट्रवादीने गळाला लावले आहे. सुनील माने यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. सुनील माने यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला आणि अजित पवारांना पुढील काळात काय फायदा होतोय हे पाहणं महत्वाचं असेल.

advertisement

मित्र पक्षांना देखील दिला धक्का

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही ठिकाणी आपल्या मित्र पक्षांना देखील धक्का दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा तारखा जाहीर केल्या आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी पुतण्याची साताऱ्यात मोठी खेळी,काकांच्या पक्षातील बडा मासा गळाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल