सातारा : केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियान राबवण्यात येत आहे. यातून मधमाशा संरक्षण मदत, मध उत्पन्नास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून अनुदानही मिळत आहे. याच अनुदानाचा शेतकऱ्यासह कंपन्या मधुमक्षिका पालक, संघ, संस्था, गट यांना या अनुदानाचा फायदा घेता येणार आहे. पण यासाठी प्रस्ताव कसा सादर करावा, कुठे सादर करावा, याबाबतची माहिती कृषी विभागाचे अधिकारी यांनी दिली.
advertisement
पिकाचे उत्पादन फलोउत्पादन आणि फुलशेतीची ही उत्पादन वाढवण्यासाठी परागीकरण महत्वाचे असते. यामध्ये मधमाशांचा मोठा वाटा राहतो. त्यातच मधुमक्षिका पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होत आहे. मधमाशांच्या वसाहतीचे जतन तसेच शेतकऱ्यांना अर्थप्राप्ती ही या योजनेतून होणार आहे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबवण्यात येत आहे. मधमाशा संरक्षण मत उत्पन्नास प्रोत्साहन आणि पर्यावरणीय शाश्वता सुनिश्चित करण्यात येत आहे.
मधक्रांतीमध्ये तीन अभियान -
लघु अभियान एक - या अभियानांतर्गत शास्त्रोक्त मधुपक्षिका पालन अवलंब करून परागीकरण करून विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता व त्यांच्या सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला जात आहे.
लघु अभियान दोन - या अभियानामध्ये पीक काढण्यानंतरच्या मधुमक्षिका पालन पोळे यांचे व्यवस्थापन लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचबरोबर संकलन, चाटण मूल्यवर्धित आदी. बाबी समाविष्ट आहेत. तसेच प्रक्रियेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये मध व इतर पोळी उत्पादनाचे संकलन विक्री ब्रँडिंगमध्ये विकसित करणे त्याचबरोबर पणन सुविधा साठवणूक व शीतगृहे तयार करणे यावर भर दिला जात आहे.
लघु अभियान तीन - या अभियानात शास्त्रोक्त मधुमक्षिका पालनास चालना देण्यात येणार आहे. यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यात येणार आहे.
मधक्रांती अनुदानासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा -
शेतकरी, मधमक्षिका पालक, संघ, संस्था, कंपन्या, स्वयंसाहाय्यक गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य कृषी विद्यापीठे, केंद्रीय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, आदी ठिकाणी अर्ज करता येईल. तर योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रस्तावासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी समीर पवार यांनी दिली.