सातारा : मराठ्यांची आणि स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून सातारा शहराची ओळख आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या नावाला दैवत्व प्राप्त झाले. अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हाताचा ठसा (हस्तमुद्रा) साताराच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि उजव्या पायाचा ठसा सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही आहे. त्या व्यतिरिक्त महाराजांची त्यांच्या हयातीत आणि महानिर्वाणानंतरची अनेक मंदिरेही आहेत. मोडी लिपीत (Modi Lipi) त्यांची स्वाक्षरी अनेक पत्रांवर आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात म्हसवडच्या राजमाने घराण्यातील सदस्यांनी त्यांच्याकडील छत्रपती शिवाजी महाराजांचा चंदनाच्या लेपात बुडवलेल्या हाताचा ठसा असल्याचा एक कागद दिला आहे.
advertisement
न्यायालय नव्हे तर चंडिका माता करते भक्तांसोबत न्याय! अनोखी आहे ही कहाणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा दुर्मिळ ठसा 50 वर्षांपूर्वी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाने जतन केला आहे. हा ठसा म्हसवडचे राजेमाने घराणे यांच्याकडून मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागिरी देताना त्यांची संपूर्ण संमती दर्शवली की, चंदनाच्या लेपामध्ये हात बुडवून त्यांची हस्त मुद्रा करून त्यावर हस्ताक्षर करत असत.
असा दुर्मिळ ठसा (हस्तमुद्रा) साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आला असल्याचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले. हा ठसा शिवभक्त आणि नागरिकांना पाहण्यासाठी लवकरात लवकर ठेवणार असल्याचे देखील सांगितले.