न्यायालय नव्हे तर चंडिका माता करते भक्तांसोबत न्याय! अनोखी आहे ही कहाणी

Last Updated:

पूर्वीच्या काळी याठिकाणी अनेक गावांतील लोक आपली गुरे घेऊन ते पाळत असत. या भागात भात, तंबाखू, मका, बाजरी आदींची लागवड होत होती.

चंडिका माता मंदिर
चंडिका माता मंदिर
हिमांशु जोशी, प्रतिनिधी
पिथौरागढ : उत्तराखंडला देवभूमी म्हटले जाते. याठिकाणी प्राचीन काळापासून देवी-देवतांचा वास असल्याचे मानले जाते. प्राचीन काळापासून याठिकाणी अनेक मंदिरांची स्थापना करण्यात आली. आज अशाच एका मंदिराबाबत आपण जाणून घेऊयात.
पिथौरागढ जिल्ह्यातील उत्तर दिशेला माँ चंडिका घाट मंदिर आहे. कुसैल ग्रामसभेत रामगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर चंडिका मातेचे मूळ स्थान मानले जाते. याठिकाणी देशभरातील भाविक न्याय मागण्यासाठी येतात. असे मानले जाते की, जेव्हा कुणावर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळत नाही, तेव्हा त्यांना चंडिका माता न्याय देते. या मंदिरात दर्शन करण्यासाठी वर्षभर भाविक याठिकाणी येत असतात.
advertisement
चंडिका मंदिरात पूजा-पाठ करणारे पुजारी हिमांशु भट्ट सांगतात की, हे मंदिर 700 वर्षे जुने आहे. लोक न्यायदेवता समजून चंडिका मातेची पूजा करतात. चंडिका मातेच्या दर्शनाने भाविक भक्तांचे कष्ट दूर होतात. चंडिका घाट मंदिरात लोक न्याय मागण्यासाठी येतात.
UPI QR Code : दुकानात लावण्यासाठी QR कोड कसा मिळतो? अगदीच सोपी आहे प्रोसेस; जाणून घ्या, किती शुल्क लागेल?
अशी मान्यता आहे की, पूर्वीच्या काळी याठिकाणी अनेक गावांतील लोक आपली गुरे घेऊन ते पाळत असत. या भागात भात, तंबाखू, मका, बाजरी आदींची लागवड होत होती. 400 वर्षांपूर्वी चंडिका मातेचे मंदिर बुंगाछीना येथील हरदेव येथे सांगितले जात होते. याठिकाणी अगदी काही अंतरावर महानंदा देवीचे मंदिर आहे.
advertisement
चंडिकाच्या मांसाहार प्रवृत्तिमुळे मां नंदाने त्यांना ही जागा सोडायला सांगितली होती. त्यानंतर चंडिका माता ती जागा सोडून नदीत वाहून रामगंगा येथे पोहोचली. याठिकाणी आज चंडिका घाट मंदिर आहे. तेथील रहिवासी लोकांनी चंडिका मातेची मूर्ती नदीतून काढली आणि एका स्वच्छ जागी ठेवली. तेव्हापासून याठिकाणी चंडिका माता विराजमान आहे.
भाविकांनी दिली ही प्रतिक्रिया -
याठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेले भाविक जगदीश जोशी यांनी सांगितले की, चंडिका मातेचे दर्शन करण्यासाठी जो कुणी भाविक खऱ्या मनापासून येतो त्याच्यावर चंडिका मातेची कृपा कायम असते. चंडिका घाट मंदिर पिथौरागढ पासून 50 किमी अंतरावर कुसैल गावात आहे. याठिकाणी सुवालेख आपल्या वाहनांच्या मदतीने पोहोचू शकतात.
advertisement
Disclaimer : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला संबंधितांशी चर्चा केल्यावर ही बातमी लिहिली गेली आहे.  ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
न्यायालय नव्हे तर चंडिका माता करते भक्तांसोबत न्याय! अनोखी आहे ही कहाणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement