सातारा : सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात कातरखटाव येथे कात्रेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या काही दिवसांपासून या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम युद्धपातळीवर सुरू झाला आहे. या मंदिराला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. त्याचबरोबर या मंदिराची खासियत म्हणजे मंदिराला हजारो टन वजन असलेल्या दगडांमध्ये कोरीव नक्षी काम केले आहे.
advertisement
हे मंदिर यादव कालीन मंदिर असल्याचं सांगण्यात येत आहे. देवगिरीचे राजे सिंघनदेव यादव हे शिखर शिंगणापूर येथे आले होते. त्यावेळी या भागांमध्ये शंकराची मंदिरे बांधण्यात आली. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना मंदिराच्या भिंतीमध्ये लहान मोठी 10 भांडी, मडकी सापडले आहेत.
काय आहे नेमकी आख्यायिका -
पूर्वीच्या काळात ही भांडी मंगल कार्यासाठी किंवा शुभकार्यासाठी वापरण्यात येत होती. कात्रेश्वर मंदिराच्या आख्यायिकेनुसार हजारो वर्षांपूर्वी एक शेतकरी आपल्या शेतामध्ये शेती करत असताना शेतामध्ये नांगर शिवलिंगाच्या वरच्या बाजूला लागला आणि त्या शिवलिंगाला कातरल्याचा आकार पडला. त्यामुळे या शिवलिंगाला कात्रेश्वर असे नाव पडले आणि गावाला कातरखटाव असेल नाव पडले आहे.
diabetes health tips : जेवणानंतर गोड खात असाल सावधान, आधी ही बातमी वाचा...
मंदिराचा जिर्णोद्धार करत असताना लहान मोठी भांडी आढळलेली आहेत. ही 10 मडकी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूमध्ये सापडले आहे. त्यामुळे भांड्यांमध्ये नद्यांचे पाणी ठेवण्यात आले असेल, असा अंदाज संशोधकांनी लावला आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. वास्तु संवर्धन आर्किटेक्ट हर्षवर्धन गोडसे यांच्या मते ही मंगल कार्यासाठी किंवा एखाद्या शुभकार्यासाठी अशी भांडी ठेवली जात असत.
अशा तऱ्हेने मंदिराच्या जिर्णोद्धारचे काम करीत असताना इतिहासकालीन सापडलेली मातीची भांडी, वस्तू हा चर्चेचा विषय बनला आहे. तर मंदिराच्या परिसरामध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या ज्या ज्या वस्तू सापडतील, त्यांचे संवर्धन शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.