सातारा: सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर अनेक ऐतिहासिक गडकिल्ले, वास्तु, जुनी वृक्ष आणि सुंदर अशी पर्यटन स्थळे आहेत. पण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एक असे गाव आहे की, त्या ठिकाणी तब्बल साडेपाच एकर क्षेत्रात वडाचं झाड पसरलेलं आहे. दाट झाडी, चहूबाजूने जंगला सारखा परिसर आहे. येथे आल्यावर जंगलात आलो आहे याची अनुभूती होते. 350 वर्षांपूर्वीचे हे झाड साडेपाच एकर क्षेत्रात फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी पसरलेलं आहे.
advertisement
कुठे आहे झाड?
साताऱ्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले जावळी तालुक्यातील म्हसवे हे गाव आहे. या गावाला तिन्ही बाजूने डोंगर, किल्ले याच्याच पायथ्याला म्हसवे गाव आहे. गावाचं मूळ नाव तसं म्हसवे मात्र या वडाच्या झाडामुळे या गावाला वडाचे म्हसवे म्हणून ओळखलं जातं आहे . ब्रिटीश काळातील इंग्रज अधिकारी वॉर्नर यांनी 1882 साली ‘फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी’ पुस्तकात नोंद करत असताना आशिया खंडातील सर्वाधिक मोठे झाड म्हणून त्याची नोंद केलेली आहे, असं गावकरी तानाजी शिर्के सांगतात.
परदेशी भाज्या करतायेत मालामाल, साताऱ्यातील शेतकऱ्याची महिन्याला अडीच लाखांची कमाई, Video
350 वर्षांपूर्वीचे हे झाड साडेपाच एकर क्षेत्रात फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी पसरलेलं आहे. हे झाड महाराष्ट्राचा जणू एक अनमोल ठेवा आहे. मात्र या वडाच्या झाडाची अनमोल किंमत प्रशासकीय यंत्रणेला नाहीये. ग्रामस्थ या वडाच्या झाडाला क दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अनेक ठिकाणी दाद मागितली आहे. मात्र मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थ नाराज असल्याचे तानाजी शिर्के यांनी बोलतांना सांगितलं आहे.
फुटपाथवर फळविक्री, आता बांधला तब्बल 50 लाख रुपयांचा बंगला; वाचा ही प्रेरणादायी गोष्ट
वडाच्या परिसरामध्ये आत जाता येत नसल्यामुळे इथे आलेले पर्यटक हे नाराज होऊन परत जावे लागते आहे. ऐतिहासिक ठेवा असलेले हे वडाचे झाड सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. लवकरात लवकर या झाडाला क दर्जा प्राप्त व्हावा आणि पर्यटनासाठी हा परिसर खुला करण्यात यावा, अशी मागणी गावकरी तानाजी शिर्के यांनी केली आहे.