परदेशी भाज्या करतायेत मालामाल, साताऱ्यातील शेतकऱ्याची महिन्याला अडीच लाखांची कमाई, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
साताऱ्यातील शेतकऱ्याने 'प्रियंका व्हेजिटेबल्स' या नावाचा परदेशी भाजीपाल्याचा ब्रँड सुरू केला आहे. त्याला विविध मोठ्या शहरांतून मागणी आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. हेच लक्षात घेऊन शेतकरी सुद्धा नवनवीन बदल करू लागले आहेत. मोठ मोठ्या शहरांमध्ये परदेशी भाज्यांना मोठी मागणी आहे. या भाज्यांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न आणि नफा मिळू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील शेतकरी धनंजय चव्हाण होय. धनंजय आणि त्यांची पत्नी आशा हे गेले 14 वर्षापासून 16 परदेशी भाज्यांची शेती करत असून महिन्याला दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न 6 एकर शेतीतून घेत आहेत.
advertisement
चव्हाण यांनी कशी केली सुरुवात?
धनंजय यांना कंपनीतील 11 वर्षाचा अनुभव आहे. तांत्रिकी ज्ञान, मार्केटचा अभ्यास, व्यापाऱ्यांची चांगले संबंध याच्या जोरावर त्यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आपल्या 6 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी परदेशी भाज्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. यात धनंजय चव्हाण यांना त्यांची पत्नी आशा चव्हाण यांची मोठी साथ लाभली आहे. ते शेतामध्ये 16 प्रकारच्या परदेशी भाज्यांची लागवड करतात.
advertisement
कोणत्या भाज्यांची शेती?
चव्हाण यांनी आपल्या 6 एकर शेतात विविध परदेशी भाज्या लावल्या. यात ब्रोकलीन, चायनीज कोबी, पॉकचॉय, चेरी टोमॅटो, लेट्यूसचे विविध प्रकार, आइसबर्ग, रोमन, रॉकेट, झुकिनीचे 2 कलर रेड आणि येलो, लेमन ग्रास, सेलेरी, पार्सली, जालापिनो मिरची यांसारख्या भाज्यांचे उत्पादन ते दरवर्षी घेत असतात. वर्षभरात परदेशी भाज्यांच्या मागणीवर ते शेतात भाज्याची लागवड करतात आणि उत्पन्न घेतात. यासाठी ते आपल्या शेतात मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात वापर करतात.
advertisement
महिन्याला अडीच लाखांची कमाई
धनंजय चव्हाण यांनी 'प्रियंका व्हेजिटेबल्स' या नावाचे ब्रँडनेम तयार केलं आहे. रोजच्या रोज काढणी, पॅकेजिंगचे नियोजन त्यांच्या पत्नी आशा करत असतात. तर विक्री आणि वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी धनंजय पाहत असतात. या मालाची थेट विक्री महाबळेश्वर मधील हॉटेलला केली जाते. त्याचबरोबर पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली,सुरत, अहमदाबाद येथे देखील केली जाते. यामुळे त्यांची वार्षिक उलाढाल 30 ते 35 लाखापर्यंत जाऊन पोहोचते. तर खर्च वगळता महिना अखेरीस दोन ते अडीच लाख रुपये नफा राहत असल्याचे धनंजय चव्हाण सांगतात.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
February 25, 2024 10:55 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
परदेशी भाज्या करतायेत मालामाल, साताऱ्यातील शेतकऱ्याची महिन्याला अडीच लाखांची कमाई, Video