अहो आश्चर्यम ..! गायीने दिला चक्क 3 वासरांना जन्म; पाहा कुठे घडली घटना Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गायीने एकत्र चक्क तीन वासरांना जन्म दिला. याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असून हा निसर्गाचा चमत्कार मानला जातोय.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : जुळी मुलं होणं हे आता सामान्य झालंय. परंतु एखाद्या स्त्रीने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला की, आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं. प्राण्यांबाबतही असंच आहे. जेव्हा गाय वासराला जन्म देते, तेव्हा तिचा गोठा आणि ते संपूर्ण घर दूध, दुग्धजन्य पदार्थांनी संपन्न होतं. सर्वत्र आनंद साजरा केला जातो. एका ठिकाणी तर गायीने एकत्र चक्क तीन वासरांना जन्म दिला. याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असून हा निसर्गाचा चमत्कार मानला जातोय.
advertisement
कुठे घडली घटना?
साताऱ्यातील वाघोली गावचे रहिवासी राजेश जाधव यांच्या गायीला गोठ्यात तीळं झाली आहेत. यामध्ये दोन कालवडी आणि एक खोंड अशा तिघांना गायीने जन्म दिला आहे. ही माहिती पाहता पाहता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनी गाय आणि तिची वासरं पाहायला राजेश यांच्या गोठ्यात गर्दी केली. हजारो गायींमागून एखादी गाय एकाच वेळी तीन वासरांना जन्म देते, असं म्हटलं जातं.
advertisement
केवळ एका म्हशीपासून सुरू केला दुग्ध व्यवसाय, आता महिन्याला तरुणाची 1 लाख रुपयांची कमाई Video
गायीच्या गर्भाशयात तीन स्त्री बीज आणि कृत्रिम रेतन पद्धतीने सोडलेल्या वीर्यातील 3 शुक्राणूंमुळे 3 वासरांचा जन्म होऊ शकतो. पशुवैद्यकीय क्षेत्रात 24 वर्ष कामाचा अनुभव असलेले वाघोलीतील डॉक्टर रतन भोईटे यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
तितर पालनातून शेतकऱ्याचे महिन्याकाठी 50 हजाराचे निव्वळ उत्पन्न; पाहा कसं केलं व्यवसायाचं नियोजन? Video
कृत्रिम रेतन ही पाळीव प्राण्यांच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीत वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठवलं जातं. नंतर गाय, म्हैस, अशा दुधाळू जनावरांचं ‘फलन’ त्याद्वारे करण्यात येतं.
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
February 24, 2024 12:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
अहो आश्चर्यम ..! गायीने दिला चक्क 3 वासरांना जन्म; पाहा कुठे घडली घटना Video