तितर पालनातून शेतकऱ्याचे महिन्याकाठी 50 हजाराचे निव्वळ उत्पन्न; पाहा कसं केलं व्यवसायाचं नियोजन? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शेतकरी झहीर खान यांनी आपल्या शेतात तितर पालन व्यवसाय सुरू केला आहे. यातून त्यांना महिन्याकाठी 50 हजाराचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटे याबरोबरच बाजारभावाचे गणित आणि सरकारी धोरणे इत्यादींचा फटका शेतीला नेहमीच बसत असतो. याच गोष्टींतून धडा घेत अनेक शेतकरी शेतीबरोबरच शेतीपूरक जोड व्यवसायाकडे वळलेले आहेत. जालना जिल्ह्यातील लहानगोला गावाचे शेतकरी झहीर खान यांनी आपल्या शेतात तितर पालन व्यवसाय सुरू केला आहे. 200 पक्ष्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायाने आता मोठ स्वरूप धारण केलं असून दर महिन्याला झहीर खान दीड हजार पक्षांची 70 रुपये नग याप्रमाणे विक्री करतात. यातून त्यांना महिन्याकाठी 50 हजाराचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.
advertisement
कशी केली सुरुवात?
झहीर खान हे मोबाईल वरती यूट्यूब पाहत असताना त्यांनी शेलगाव येथील एका शेतकऱ्याच्या तितर पालक व्यवसायाचा व्हिडिओ पाहिला. यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याशी संपर्क साधला. प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन व्यवसायाची पाहणी केली आणि 200 तीतर पिल्लांची नोंदणी केली. व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात मात्र त्यांनी हार न मानता व्यवसायात तग धरून ठेवला कोरोना काळात तर प्रचंड अडचणी आल्या, असं झहीर खान सांगतात.
advertisement
शेतकऱ्याचा नादच खुळा! चक्क बेडवर केली ज्वारी लागवड, पीक करणार मालामाल, Video
मात्र व्यवसाय टिकून ठेवल्याचे गोड फळे आता मिळत आहेत. तब्बल दीड ते दोन हजार पक्ष्यांची विक्री दर महिन्याला ते या व्यवसायातून करतात. 70 रुपये नगाने या पक्षांची विक्री केली जाते. महिन्याकाठी 1 ते सव्वा लाख रुपयांच्या पक्षांची विक्री होते. यातून महिन्यासाठी 50 ते 60 हजारांचा निव्वळ नफा राहतो, असे झहीर खान यांनी सांगितलं.
advertisement
लखपती बनवणारा हंगामी व्यवसाय; 25 हजार उत्पन्न मिळणाऱ्या पिकातून दीड लाखांची कमाई PHOTOS
व्यवसाय वाढू लागल्यानंतर त्यांनी स्वतःच इंक्युबॅशन मशीन खरेदी केलं. यामुळे मोठ्या संख्येने अंड्यांपासून तीतर पिल्यांची निर्मिती शक्य झाली. आता त्यांच्याकडे दर 17 दिवसांनी तब्बल 1200 ते 1500 तितर पिल्ले तयार होतात. व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी कुठलीही जाहिरात आतापर्यंत केली नाही. माऊथ पब्लिसिटीमुळेच त्यांच्या व्यवसायात वृद्धी झाली. तरुण शेतकऱ्यांनी तसेच व्यवसायिकांनी देखील या व्यवसायात उतरून आपली आर्थिक प्रगती करावी, असे आवाहन झहीर खान करतात.
advertisement
कसं करतात नियोजन?
100 तितर पिल्लांना मोठं करण्यासाठी एक बॅग खाद्याची आवश्यकता असते. 1500 पिल्लांना मोठे करण्यासाठी 15 बॅक खाते लागते. एका बॅगेसाठी 2350 रुपयांचा खर्च येतो तर पंधराशे पिलांसाठी 35000 च्या आसपास खर्च येतो. 1500 पिलांपासूनच्या विक्रीतून 1 लाखांच्या आसपास रक्कम येते. 35 हजार रुपये यांचे खाद्य आणि 15 हजार रुपये इतर खर्च असा 50 हजार रुपये खर्च आणि 50 हजार रुपये निव्वळ नफा असे या व्यवसायाचे गणित आहे, असे झहीर खान सांगतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
February 21, 2024 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तितर पालनातून शेतकऱ्याचे महिन्याकाठी 50 हजाराचे निव्वळ उत्पन्न; पाहा कसं केलं व्यवसायाचं नियोजन? Video