शेतकऱ्याचा नादच खुळा! चक्क बेडवर केली ज्वारी लागवड, पीक करणार मालामाल, Video

Last Updated:

मोत्यासारखे टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस असलेल्या ज्वारीच्या या पिकातून त्यांना केवळ अर्ध्या एकरात 12 ते 15 क्विंटल उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

+
शेतकऱ्याचा

शेतकऱ्याचा नादच खुळा! चक्क बेडवर केली ज्वारी लागवड, पीक करणार मालामाल, Video

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: आपल्या देशातील बहुतांश जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. या व्यवसायासमोर अनेक आव्हाने आहेत. निसर्गाचा असमतोल, बाजारभावाची गणितं आणि पिकाला मिळणारा अत्यल्प दर यातूनच मार्ग काढत अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. जालना जिल्ह्यातील अशोक पांढरे या शेतकऱ्याने ज्वारीची चार फुटांच्या बेडवर लागवड केली आहे. मोत्यासारखे टपोरे दाणे आणि भरगच्च कणीस असलेल्या ज्वारीच्या या पिकातून त्यांना केवळ अर्ध्या एकरात 12 ते 15 क्विंटल उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
प्रयोगशील शेतकरी अशोक पांढरे
अशोक पांढरे हे जालना जिल्ह्यातील काजळा या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी आहेत. घरी शेती कमी असल्याने ते वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असतात. तुर्की इथून आणलेल्या बाजरीमुळे देखील अशोक पांढरे चर्चेत आले होते. त्याचबरोबर बेडवर केलेल्या सोयाबीन लागवडीतून देखील त्यांनी भरपूर उत्पन्न मिळवले. आता त्यांनी ज्वारीच्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे.
advertisement
चक्क बेडवर लावली ज्वारी
ज्वारीची पारंपारिक पद्धतीने पेरणी करून अनेक शेतकरी एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न घेतात. मात्र अशोक पांढरे यांनी बार्शी येथील शेतकऱ्याकडून बियाणे मागवून त्याची चार फुटांच्या बेडवर लागवड केली. बेडवरती ठिबकची देखील व्यवस्था करण्यात आली. लागवडी वेळी 10 26 26 या खताची एक बॅग देण्यात आली. तर ज्वारी वाढीच्या अवस्थेत असताना 19 19 या विद्राव्य खताची मात्रा दोन वेळा देण्यात आली. योग्य नियोजन आणि प्रयोग करण्याचे धाडस यामुळे त्यांच्या शेतातील ज्वारी चांगलीच बहरली असून यातून 20 ते 25 कट्टे म्हणजे 12 ते 15 क्विंटल ज्वारी होण्याची अपेक्षा अशोक पांढरे यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
मोबाईलवरून मिळाली माहिती
मोबाईल चाळत असताना युट्युब वर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्याला दीड एकरात साठ गोण्या ज्वारी झाल्याचं पाहिलं. लगेच तिथे दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल केला. शेतकऱ्याने बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितलं. त्या शेतकऱ्यांनी दोन-तीन वर्षांमध्ये निवडक कणसे जमा करून बियाणे तयार केल्याचं सांगितलं. चार फुटांच्या बेडवर ठिबक अंथरून या ज्वारीची लागवड केली. खत आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ज्वारीचे पीक चांगलं बहरात आलं असून भरघोस उत्पन्न मिळेल, असं पांढरे यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्याचा नादच खुळा! चक्क बेडवर केली ज्वारी लागवड, पीक करणार मालामाल, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement