वडिलांनी सव्वा एकरात लावली 50 झाडे, शेतकरी पुत्र घेतोय 3 लाखांचं उत्पन्न, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
एका झाडापासून तब्बल दीड क्विंटल चिकूचे उत्पन्न मिळत असून सव्वा एकरात 3 लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र दुष्काळ, बाजारभावाचे गणित आणि निसर्गातील असमतोल यामुळे शेती हा घाट्याचा सौदा ठरत आहे. मात्र अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देऊन वेगवेगळी पिके घेऊन शेती फायदेशीर ठरवत आहेत. जालना जिल्ह्यातील मार्डी येथील शेतकरी दत्ता राऊत यांनी देखील अशीच किमया केली आहे. केवळ सव्वा एकर क्षेत्रावर चिकू शेती फुलवून त्यांनी तब्बल 3 लाखांचे उत्पन्न मिळवले.
advertisement
वडिलांनी लावली चिकूची बाग
दत्ता राऊत हे मार्डी या अंबड तालुक्यातील छोट्याशा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील शेषराव राऊत यांनी काही वर्षांपूर्वी एक चिकू बाग खरेदी केली. यातून त्यांना चिकू शेती विषयी माहिती मिळाली. तसेच चिकू शेती मधून चांगले उत्पन्न मिळू शकते, याचा अंदाज आला. 1995 मध्ये त्यांनी स्वतःच्या सव्वा एकर शेतामध्ये 33 बाय 33 अंतरावर 50 चिकू झाडांची लागवड केली. यासाठी रोपांची व्यवस्था नागपूर येथून करण्यात आली. कालीपत्ती नावाची जात त्यांनी चिकू लागवडीसाठी निवडली, असे राऊत सांगतात.
advertisement
एका झाडाला दीड क्विंटल माल
अवघ्या पाचच वर्षांमध्ये चिकू झाडांना फळे लगडल्यास सुरुवात झाली. सुरुवातीला उत्पन्न कमी मिळत असलं तरी त्यामध्ये आंतरपीके देखील घेतली. आता ही झाडे तब्बल तीस वर्षांची झाली आहेत. एका झाडापासून तब्बल दीड क्विंटल चिकूचे उत्पन्न होत आहे. वडिलांनी लागवड केलेल्या चिकूच्या झाडांची पुढे दत्ता राऊत यांनी चांगली निगा राखली असून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळत आहे.
advertisement
चिकू शेतीतून 3 लाखांचं उत्पन्न
विशेष म्हणजे ठोक व्यापाऱ्याला चिकूचा बाग न देता राऊत यांनी अंबड येथील मंडी मध्ये स्वतःच हातावरची चिकूची विक्री केली. 50 ते 60 रुपये प्रति किलो या दराने चिकूची विक्री करून त्यांना 3 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे चिकू शेतीला फवारणी करण्याची आवश्यकता नाही. तसेच अत्यंत कमी पाण्यावर देखील चिकूचे पीक धरू शकते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील शिकू शेतीची कास धरावी, असं आवाहन दत्ता राऊत करतात.
advertisement
50 झाडांतून लखपती
गावशिवारात एक ते दीड एकर शेतात चिकू फळबागांची लागवड करून 50 झाडांतून वर्षाला सरासरी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यासाठी आता कोणताही खर्च करावा लागत नाही. पाण्याची कमी मात्रा मिळाली तरी उत्पन्नाची हमी आहे. सततचा दुष्काळ, रोगराई, बेमोसमी पाऊस यामुळे इतर पिकं हातची जातात. मात्र चिकूच्या फळझाडातून हातात चार पैसे नगदी मिळतात. याचे समाधान व मनस्वी आनंद असल्याचे दत्ता राऊत सांगतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
February 15, 2024 11:58 AM IST