सातारा : छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जन्मोत्सवानिमित्त जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गांगवली ते सातारा असा हा पालखी सोहळा होता.
या पालखी सोहळ्याचे स्वागत साताऱ्यातील शिवतीर्थ येथे येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष छत्रपती, थोरले शाहू महाराज पालखी सोहळ्याचे समन्वयक सुहास राजेशिर्के आणि समस्त सातारकर शाहूप्रेमी यांनी केले. छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा 1682 ला रायगड जवळील माणगाव तालुक्यातील गांगवली याठिकाणी झाला होता. त्यांनी अखंड हिंदुस्थानावर 42 वर्ष राज्यकारभार केला.
advertisement
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केलं. त्यांची कारकीर्द कशी राहिली, त्यांनी राज्यकारभार कसा केला, हाच इतिहास पुढे आणण्यासाठी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. साताऱ्यातील शाही घराण्याचे वारसदार यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम करा
आपल्याला आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इथपर्यंत माहिती आहे. यानंतर या राजधानी साताऱ्याचे जनक, अखंड हिंदुस्तानावर राज्य करणारे, स्वराज्याची चौथी राजधानी ज्यांनी वसवली, दिल्लीचे तख्तदेखील साताऱ्यातून चालवण्याचं साहस, धाडस ज्या छत्रपतींमध्ये होते, त्या छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा इतिहास जनमानसांपर्यंत पोहोचवा, हा या पालखी सोहळ्या मागचा उद्देश्य आहे आणि त्यामुळेच मागील 2 वर्षापासून हा या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिवव्याख्याते सायली प्रमोद भोसले पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी सातारा शहराची स्थापना केली. म्हणूनच सातारा नगरीला शाहूनगरी असे संबोधले जाते. मात्र, त्यांच्या स्मृती जागवणारे कोणतेही ऐतिहासिक चिन्ह सातारा शहरात नाही. त्यामुळे येसूबाई फाउंडेशन आणि छत्रपती शाहू महाराज थोरले समन्वयक समितीच्या वतीने जन्मभूमी ते कर्मभूमी अशी संकल्पना घेऊन गांगवली ते सातारा असे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
फक्त फळच नाही, त्याच्या बियाही आहेत खूपच गुणकारी, लठ्ठपणासह अनेक आजारांपासून मिळतो आराम
यंदा या पालखी सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे. पालखी सोहळ्याचे पोवई नाका शिवतीर्थ येथे आगमन झाले. यावेळी सातारा नगरीची भूषण आणि 12 व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी धैर्या विनोद कुलकर्णी हिचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सर्व नागरिकांनी या भव्य पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
हा पालखी सोहळा माणगाव, रायगड, पोलादपूर, महाबळेश्वर, मेढा-मार्गे साताऱ्यात दाखल झाली. या दरम्यान, ठिकठिकाणी पालखीचे भव्य स्वागत झालं. यानंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन करून येथून हा पालखी सोहळा छत्रपती शाहू महाराजांची समाधी असणाऱ्या क्षेत्र माहुली येथे जाऊन याची सांगता झाली.





