शिवसागर जलाशयात मुली बुडाल्या
सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत असलेल्या शिवसागर जलाशयात आज दुपारी तीन मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना पाण्याच्या बाहेर काढून लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे वेंगळे गावावर शोक काळा पसरली आहे. याची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
March 31, 2024 9:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara News : साताऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुली बुडाल्या; दोन मुलींचा मृत्यू तर एकीला वाचवण्यात यश
