TRENDING:

शंकराच्या पिंडीचा आकार, स्थापत्य शैलीचा अनोखा अविष्कार, बाजीराव विहिरीचा केंद्राच्या पोस्ट खात्याकडून गौरव

Last Updated:

Bajirao Well Satara - ही विहीर स्थापत्य शैलीचा एक अनोखा अविष्कार आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभलेली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरची विहीर म्हणून या विहिरीची ओळख आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा - सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या कारकिर्दीत साताऱ्यात ज्या आधुनिक सुधारणा झाल्या, त्यात प्रामुख्याने पाण्याची सोय करणे हे त्यांचे एक मोठे योगदान आहे. 17 व्या शतकात राजधानी सातारा येथे आजच्या शुक्रवार पेठेत तत्कालीन बाजीराव पेठ या शहराच्या पिण्याच्या सोयीसाठी थोरले बाजीरावांनी विहीर बांधली, हीच विहीर आजची बाजीराव विहीर म्हणून महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाली आहे. या विहिरीचा केंद्राच्या पोस्ट खात्याकडून या ऐतिहासिक विहिरीचा गुणगौरव करण्यात आला आहे. या विहिरीचा इतिहास नेमका काय आहे, याचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

advertisement

ही विहीर स्थापत्य शैलीचा एक अनोखा अविष्कार आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभलेली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरची विहीर म्हणून या विहिरीची ओळख आहे. सातारा शहरासाठी कास पाणीपुरवठा योजना होण्याआधी तत्कालीन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या बाजीराव विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात होता. शंकराच्या पिंडीसारखा आकार असल्याने या विहिरीला 9 कमानी आहेत.

advertisement

मैत्रिणीनं दिली ती माहिती अन् सुरू झाला ध्येयवेडा प्रवास, छ. संभाजीनगरच्या लेकीला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

अत्यंत भक्कम दगडी बांधकाम असलेली विहीर संपूर्ण काळ्या पाषाणात आहे. सुमारे 100 फूट खोल ही विहीर आहे. बाजीराव विहिरीच्या भिंतीवर छत्रपती शाहू महाराजांचे राज्य चिन्हांकित शिल्प कोरण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील एकमेव अशी ही विहीर आहे. या विहिरीचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे, जसे राज्य चिन्ह असलेली ही एकमेव विहीर आपल्याला भारतात पाहायला मिळते.

advertisement

अनेक विहिरींचा आकार साधारणपणे गोल असतो. मात्र, ही बाजीराव विहीर शंकराच्या पिंडीच्या आकारात बांधण्यात आली आहे. आकाशातून याचे छायाचित्र घेतल्यास हा आकार स्पष्टपणे दिसून येतो. याच कारणामुळे केंद्राच्या पोस्ट खात्याकडून या ऐतिहासिक विहिरीचा गुणगौरव करण्यात आला आहे.

सध्या बाजीराव पेशवे यांची विहीर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांच्या मालकीची आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आठ विहिरींचे छायाचित्र केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याच्या पोस्ट कार्डवर छापण्यात येणार आहे. यात ऐतिहासिक बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्ट कार्डवर छापण्यात येणार असल्याने सातारकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
शंकराच्या पिंडीचा आकार, स्थापत्य शैलीचा अनोखा अविष्कार, बाजीराव विहिरीचा केंद्राच्या पोस्ट खात्याकडून गौरव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल